ओटीटी प्रेमींसाठी दुःखद बातमी: नेटफ्लिक्स प्रमाणे डिस्ने पासवर्ड शेअरिंगला आळा घालणार !

पासवर्ड शेअर करायचा असल्यास अधिकचे पैसे मोजावे लागणार

    05-Apr-2024
Total Views |

Disney
 
 
मुंबई: ओटीटी प्रेमींसाठी दुःखद बातमी आली आहे. डिस्नेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बॉब आयगर यांनी नेटफ्लिक्स प्रमाणेच पासवर्ड शेअरवर बंदी आणण्याचे ठरवले असल्याचे सांगितले आहे. कंपनीच्या महसूलात व सबस्क्रिप्शनममध्ये वाढवण्यासाठी हा धोरणात्मक निर्णय कंपनीने घेतले असल्याचे बॉब आयगर यांनी सांगितले आहे.
 
या स्पर्धेत कंपनीच्या महसूलात दोन अंकी वाढ होण्यासाठी कंपनी प्रयत्नशील असल्याचे आयगर म्हणाले आहेत. सीएनबीसीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केले आहे. डिस्नेवर गुंतवणूकदार नेल्सन पेल्ट्झ यांनी डिस्ने बद्दल केलेल्या टिपणीनंतर आयगर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. कंपनीच्या कामगिरीबाबत नेल्सन पेल्ट्झ यांनी टीका केली होती. 'आम्ही कंपनीच्या आर्थिक स्थिती मजबूत करण्याबाबत सकारात्मक असल्याचे यावेळी आयगर म्हणाले आहेत. पासवर्ड शेअरींगवर जूनपासून सुरू होणार आहे.
 
अनाधिकृत पासवर्ड शेअरिंगवर आता बंदी येणार आहे. याआधी नेटफ्लिक्स हा निर्णय घेतला होता. घराबाहेर पासवर्ड शेअरिंगवर ज्यादा पैसे आकारण्याचे नेटफ्लिक्सने ठरवले होते. या निर्णयाची अंमलबजावणी आता डिस्नेदेखील करणार आहे.अनधिकृतपणे पासवर्ड शेअर केल्यास सबस्क्राईबरला साईन अप करण्याकरिता पुन्हा विचारले जाऊ शकते. नुकतेच डिस्ने व हुलू यांनी एकत्रितपणे नवीन अँप बाजारात आणले होते. आयगर यांनी कंपनीच्या नफ्यात वाढ करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.