ठाकरेंनी भरला काँग्रेसला दम! म्हणाले, "सांगलीची जागा..."

    03-Apr-2024
Total Views |
 
Thackeray
 
मुंबई : सांगलीची जागा आमचीच असून आम्ही तिथे प्रचारालाही सुरुवात केली आहे, असे वक्तव्य उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी केले आहे. ते बुधवारी पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी सांगलीची जागा आमचीच आहे, असे म्हणत त्यांनी काँग्रेसला चांगलाच दम भरला आहे.
 
उद्धव ठाकरे म्हणाले की, "सांगलीची जागा जाहीर होऊन १० दिवस झालेले आहेत. आमची तिकडे प्रचाराची सुरुवात झाली आहे. त्यामुळे आम्ही जशी रामटेक, अमरावती, कोल्हापूरची जागा आम्ही सोडली, तशीच काँग्रेसने अधिक वेळ न दवडता ज्याप्रमाणे जागावाटप झालेलं आहे त्याप्रमाणे काम करायला सुरुवात करावी, अशी माझी अपेक्षा आहे," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  उबाठा गटाची दुसरी यादी जाहीर! वाचा कोण कुठे लढणार...
 
सागंली लोकसभेसाठी उबाठा गटाकडून डबल महाराष्ट्र केसरीचे चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, काँग्रेसने ही जागा आमचीच असल्याचा दावा केला आहे. काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम आणि विशाल पाटील हे दोघेही या जागेवर दावा करत आहेत. दरम्यान, आता उद्धव ठाकरेंनी ही जागा आमचीच असल्याचे स्पष्ट केले आहे.
 
तसेच प्रकाश आंबेडकरांविषयी बोलताना ते म्हणाले की, "प्रकाश आंबेडकर आणि माझ्या आजोबांचा एक ऋणानुबंध होता. त्याला जागून मी त्यांना एवढंच सांगेन की, आपण हुकुशाहीविरुद्ध एकत्र आलो होतो. आज जरी तुमचं आमचं जमलं नसेल तरीसुद्धा ते भविष्यात जमणारच नाही अशी भूमिका घेऊ नका. संजय राऊतांवर त्यांनी केलेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही," असेही ते म्हणाले.