मुंबई: बाजार नियामक सेबीने स्टॉक एक्सचेंजला पत्र लिहीत वाढीव फीची मागणी केली आहे. या डेव्हलपमेंट नंतर बीएसईमधील समभागात १७ टक्क्यांनी घसरण सुरू झाली आहे.ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट मध्ये सेबीने कंपन्यांना वाढीव फी ची मागणी केल्याने अचानक समभागात घसरण झाली आहे.मुख्यतः ही वाढ ' प्रिमियम व्हॅल्यु ' वर न करता 'नोशनल व्हॅल्यु' वर केल्याने सेबीने कंपन्यांची नाराजी ओढवून घेतली आहे.
या संदर्भात सेबीने (Security Exchange Board of India) ने बीएसईला रेग्युलेटरी फी भरण्याचे आवाहन केले आहे.एकूण उलाढालीत (Annual Turnover) फी चे मूल्यमापन ऑप्शनल कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी प्रिमियम व्हॅल्युवर न करता नोशनल व्हॅल्युवर करण्यास सांगितले आहे.
ऑप्शनल कॉन्ट्रॅक्टमध्ये नोशनल व्हॅल्यु म्हणजे एखाद्या समभागाची बाजारातील किंमत गुणिले कॉन्ट्रॅक्टमध्ये असलेली रक्कम होय. बीएसईने ऑप्शनल कॉन्ट्रॅक्टमध्ये वार्षिक उलाढाल ही गणना प्रिमियम व्हॅल्युवर केली होती. त्यामुळे प्रिमियम व नोशनल व्हॅल्युमधील फरकासकट व्याज भरण्यासाठी सेबीने आदेश दिले आहेत.प्रिमियम व्हॅल्यु म्हणजे ऑप्शन धारक एखादी असेट ठरवलेल्या किंमतीत ठरवलेल्या दिवशी विकण्याचे ठरवतो ती किंमत होय.
बीएसईला एकूण फरकातील १६५ कोटी रुपये भरण्याचे सांगितले आहे.यामध्ये आर्थिक वर्ष २००७ पासून आर्थिक २०२३ पर्यंत ६९ कोटी व आर्थिक वर्ष २०२४ साठी ९६ कोटी प्रलंबित किंमत भरण्यास सांगितली आहे.एमसीएक्सला देखील ४.४३ कोटींची फी भरण्यास सांगितली आहे. या बातमीनंतर बीएसईतील समभागात (shares) मध्ये १७ टक्क्यांनी घसरण झाली आहे.तरीदेखील या समभागात वर्षभरात एकूण ४०० टक्क्यांनी वाढ झाली आहे.