आरक्षणाचा मोठा वाटा अल्पसंख्यांकांना देण्याचा काँग्रेसचा डाव!

नरेंद्र मोदींनी केली विरोधकांची पोलखोल

    29-Apr-2024
Total Views |

Congress 
 
सोलापूर : काँग्रेस आणि इंडी आघाडीच्या हातातून दलित, आदिवासी आणि ओबीसी निसटले आहेत. त्यामुळे त्यांचे आरक्षण अल्पसंख्यांकांना देण्याचा त्यांचा डाव आहे, अशी पोलखोल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. सोमवारी सोलापूर येथे आयोजित सभेत ते बोलत होते.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “ज्याप्रमाणे दशकानुदशके काँग्रेसने एससी, एसटी आणि ओबीसींचा विश्वासघात केला, त्यामुळे सर्वजन काँग्रेस आणि इंडी आघाडीवर नाराज आहेत. म्हणूनच काँग्रेस आणि इंडी आघाडी पूर्णपणे चिडलेली आहे. त्यामुळे ते संविधान बदलणार आणि आरक्षण नष्ट करणार अशा खोट्या गोष्टी पसरवत आहेत. परंतू, आज स्वत: बाबासाहेब आंबेडकरांना वाटलं तरीसुद्धा ते आरक्षण संपवू शकत नाहीत. त्यामुळे मोदींचा तर प्रश्नच नाही.”
 
हे वाचलंत का? -  "इंडी आघाडीचा फॉर्म्युला! पाच वर्षांत पाच पंतप्रधान!"
 
“शेकडो वर्षांपासून त्यांच्यावर अन्याय होत आहेत. आपल्या पूर्वजांनी केलेल्या पापाचं प्रायश्चित्त करण्याची संधी आज मला आहे. त्यामुळे आरक्षणाला मी माझी पूर्ण ताकद लावेल. दलित, आदिवासी आणि ओबीसी काँग्रेस आणि इंडी आघाडीच्या हातातून निसटले आहेत. त्यामुळे त्यांनी एससी, एसटी आणि ओबीसींच्या आरक्षणात लूट करुन ते अल्पसंख्यांकांना देण्याचा त्यांचा डाव आहे,” असे ते म्हणाले.
 
“परंतू, काँग्रेसचे हे षडयंत्र देशात कुठेही होऊ न देण्यासाठी मला ताकद हवी आहे. त्यांनी कर्नाटकमध्ये आरक्षणाचा मोठा वाटा अल्पसंख्यांकांना देण्याचा खेळ खेळला आहे. परंतू, मी हे होऊ देणार नाही. काँग्रेसच्या ६० वर्षांच्या कार्यकाळात देशात सर्वात जास्त एससी, एसटी आणि ओबीसी परिवारांचे हाल झालेत. पण मोदीने या परिवारांना आपली प्राथमिकता समजून दहा वर्षात गरीब कल्याणाच्या योजना बनवल्या आहेत,” असेही ते म्हणाले.