इंदूरमध्ये सूरत पॅटर्न : काँग्रेस उमेदवाराचा अर्ज मागे

अक्षय बाम यांनी लोकसभा निवडणूक अर्ज घेतला मागे

    29-Apr-2024
Total Views | 153

Akshay



इंदूर :
मध्य प्रदेश लोकसभा निवडणूकीतील तिसऱ्या टप्प्यात भाजपच्या खेळीने इंडी आघाडीला घाम फुटला आहे. मध्य प्रदेशच्या इंदूर लोकसभा काँग्रेस उमेदवार अक्षय कांति बम यांनी आपला निवडणूक अर्जच मागे घेतला. निवडणूक अर्ज माघारी घेण्याची आजची अखेरची तारीख होती. त्यामुळे काँग्रेसला इंदूरमध्ये हा मोठा दणका मानला जातोयं. यातच अक्षय यांनी भाजप आमदार रमेश मेंदोला यांच्यासह जाऊन अर्ज मागे घेतला. यानंतर थोड्याच वेळात भाजप कार्यालयात जाऊन पक्षप्रवेश केला. या सर्व प्रकारामुळे काँग्रेस पुन्हा एकदा तोंडघशी पडली आहे.





भाजपचे वरिष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे कॅबिनेट मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी याबद्दल माहिती दिली आहे. कैलाश विजयवर्गीय यांनी अक्षय बम यांच्यासोबत सेल्फी काढत याबद्दल ट्विट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव अध्यक्ष वीडी शर्मांच्या नेतृत्त्वात भाजपमध्ये त्यांचे स्वागत आहे, अशी पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर केली आहे. इंदूर लोकसभेच्या उमेदवारांचा अर्ज भरण्यासाठी २५ एप्रिल हा शेवटचा दिवस होता. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा २९ एप्रिल हा अखेरचा दिवस होता. इंदूर लोकसभेसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे. ४ जून रोजी निकाल जाहीर होणार आहे.



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121