मविआकडूनच छत्रपती शाहू महाराजांचा खरा अपमान!

    27-Apr-2024
Total Views |

Sanjay Raut 
 
कोल्हापूर : छत्रपती शाहू महाराजांचा खरा अपमान हा महाविकास आघाडीने केला आहे, अशी टीका कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कोल्हापूर दौऱ्यावर केलेल्या टीकेला आता हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिले. शनिवारी टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.
 
हसन मुश्रीफ म्हणाले की, "आम्ही गादीचा सन्मान करतो. परंतू, मत मोदीजींनाच देणार हे सर्व जनतेने ठरवलं आहे. वास्तविक महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आमच्या छत्रपती शाहू महाराजांचा फार मोठा अपमान केला आहे. महाविकास आघाडीने शाहू महाराजांना राज्यसभेवर पाठवलं असतं तर त्यांचा फार मोठा सन्मान झाला असता. शाहू महाराजांना निवडणूकीच्या रिंगणात उतरवून त्यांना दारोदारी फिरवणं हा त्यांचा मोठा अपमान आहे.
 
हे वाचलंत का? -  काँग्रेसचा प्रचार करणार नाही! बड्या नेत्याची घोषणा
 
शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. महायूतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ त्यांची भव्य सभा आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान, यावर संजय राऊतांनी टीका केली होती. छत्रपती शाहू महाराजांचा पराभव करण्यासाठी मोदी येत आहेत., हे महाराष्ट्र लक्षात ठेवेल, असे ते म्हणाले. यावर आता हसन मुश्रीफांनी त्यांना खडेबोल सुनावले.