नाशिकची जागा शिवसेनेचीच!, उद्यापर्यंत उमेदवार जाहीर होणार!

    26-Apr-2024
Total Views |
nashik loksabha shivsena  
 

 
मुंबई :     उद्यापर्यंत नाशिकचा उमेदवार जाहीर होणार, असा खुलासा शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी केला आहे. नाशिकच्या जागेवरून महायुतीमधून अंतर्गत कुरबुरी सुरू असल्याचे पाहायला मिळत असतानाच नाशिकची जागा शिवसेनेचीच असा दावा शिरसाटांनी केला आहे. शिरसाटांच्या दाव्यानंतर शिवसेनेकडून कुणाला उमेदवारी मिळणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
 
दरम्यान, नाशिकचा जागा शिवसेनेचीच असून त्याची घोषणा उद्या सकाळी होणार आहे, असं मोठं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केले आहे. महत्त्वाचे म्हणजे नाशिकच्या जागेकरिता महायुतीमध्ये स्पर्धा पाहायला मिळत आहे. अजित पवार गटाकडून छगन भुजबळ यांचेदेखील या जागेकरिता प्रयत्न सुरु असल्याची चर्चा सुरू होती. त्यानंतर आता संजय शिरसाट यांच्याकडून या चर्चांना पूर्णविराम लावण्यात आला आहे.
 
 
हे वाचलंत का? - मविआच्या काळात माझ्यावर केस टाकण्याचा प्रयत्न झाला!


नाशिकच्या जागेसाठी शिवसेनेकडून उमेदवाराची घोषणा उद्या सकाळी होणार आहे. तसेच, नाशिकच्या जागेचा तिढा सुटणार असून उद्या विषय संपविला जाईल. तसेच, भुजबळांच्या निकटवर्तीयांना अर्ज घेण्याचा अधिकार आहे. मात्र १०० टक्के ही जागा शिवसेनेची असून त्या संदर्भात घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार, असे संजय शिरसाट यांनी सांगितले.