ममता बॅनर्जींनी केला उच्च न्यायालयाचा अपमान; "भारतीय जनता पार्टीने उच्च न्यायालय........

    25-Apr-2024
Total Views |
ममता

कोलकाता :
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी थेट उच्च न्यायालयावरच टिका केली आहे. भारतीय जनता पार्टीने उच्च न्यायालय विकत घेतले आहे असं त्यांनी म्हटलं आहे. कलकत्ता उच्च न्यायालयाने शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी दिलेल्या निकालावर बोलताना त्यांनी असं वक्तव्य केलं आहे.
 
कलकत्ता उच्च न्यायालयाने शिक्षक भरती घोटाळ्यामध्ये भरती झालेल्या २६ हजार शिक्षकांची भरती रद्द केली. त्यांनंतर भडकलेल्या ममता बॅनर्जींनी काहीही झाले तरी शिक्षक आणि सरकारी कर्मचऱ्यांकडुन भाजप आणि सीपीएमला एकही मत मिळू नये असं आव्हान त्यांनी केलं.
 
आपले मत व्यक्त करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, “त्यांनी (भाजप) उच्च न्यायालय विकत घेतले आहे. त्यांनी सीबीआय विकत घेतली आहे. त्यांनी NIA विकत घेतली आहे. त्यांनी बीएसएफ विकत घेतले आहे. त्यांनी CAPF विकत घेतला आहे. त्यांनी दूरदर्शनचा रंग बदलून भगवा केला आहे. ते फक्त भाजप आणि मोदींबद्दल बोलतात. त्याच्याकडे अजिबात पाहू नका. त्याच्यावर बहिष्कार घाला." असं मत व्यक्त केलं आहे.
 
सीएम ममता यांच्या या वक्तव्यानंतर ज्येष्ठ वकील विकास रंजन भट्टाचार्य यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात याचीका दाखल केली. लोक न्यायव्यवस्थेवर हसत आहेत. न्यायाधिशांना पक्षपाती म्हटलं जात आहे. ममता बॅनर्जींचं वक्तव्य हा न्यायव्यवस्थेचा अवमान असल्याचे ते म्हणाले.