सगळे मुस्लीम ओबीसी?

    25-Apr-2024   
Total Views |
 obc
 
आता कनार्टकच्या काँग्रेस सरकारने राज्यातील सगळ्या मुस्लिमांना, इतर मागासवर्गीय समाजाच्या कोट्यातून आरक्षण जाहीर केले आहे. कर्नाटकमधील सगळा मुस्लीम समाज आता ओबीसी म्हणून आरक्षण मिळविणार आहे. ओबीसी समाजाचा हक्क मागणार्यात काँग्रस सरकारचा निषेध करावा तितका थोडा. देशभर राहुल गांधी जातीनिहाय जनगणना करणार म्हणतात, ते यासाठीच का? हिंदू ओबीसींचे आरक्षण सरकसट सर्व मुस्लिमांना देण्यासाठी का?
 
डॉ.बाबासाहेबांनी जातीपातीच्या विळख्यात पिचलेल्या मागासवर्गीय समाजासाठी आरक्षण दिले होते. ते आरक्षण धर्मावर नाही तर जातीवर आधारित होते. मात्र, कर्नाटक काँग्रेस सरकारने बाबासाहेबांच्या विचारांना नाकारत सरसकट सर्वच मुस्लिमांना ओबीसी कोट्यातून आरक्षण जाहीर केले. कोणी म्हणेल की, मंडल आयोगामध्येही मुस्लिमांना आरक्षण दिले होते. मात्र, मंडल आयोगाच्या १२ व्या भागातील १८ व्या परिच्छेदात कोणत्या मुस्लिमांना आरक्षण मिळणार, हे स्पष्ट केले आहे. त्यानुसार, ज्यांचे पूर्वज हिंदू मागासवर्गीय समाजाचे होते, ते आणि दुसरे हिंदू समाजातील बलुतेदार असलेल्या समाजाचे समकक्ष असलेले मुस्लीम.
 
उदाहरणार्थ तेली, लोहार, कुंभार, सुतार वगैरे. या परिक्षेपात संविधानात्मक तरतूदी किंवा मंडल आयोगाला नाकारत कर्नाटक काँग्रेस सरकारने राज्यातील सर्वच मुस्लिमांना ओबीसीचा दर्जा कोणत्या आधारावर दिला? काँग्रेसचे नेते म्हणतात की, “बाबासाहेबांनी जातीनिहाय आरक्षण दिेले. मुस्लिमांमध्येही जाती आहेत. सय्यद, पठाण वगैरे लोकांना मुस्लीम समाजात हिंदूंमधील ब्राम्हण, क्षत्रीय सारखा जातींचा दर्जा आहे. ते इतर मुस्लिमांशी जातीभेद करतात. त्यांच्यात बेटी व्यवहार होत नाही. मुस्लिमांमध्येही गरीब आणि मागास मुस्लीम समाज आहे.” पण, मग असे जर असेल, तर कर्नाटक सरकारने या सय्यद, पठाण वगैरेंनाही ओबीसीचा दर्जा दिला आहे.
 
यावर पुन्हा काँग्रेस म्हणते की, “मुस्लीम आर्थिक दृष्ट्या मागास आहेत.” पण, सैय्यद, पठाण, शेख आणि मुघल नाव लावणारे मुस्लीम हे स्वतःला मागासवर्गीय मानतात का? कर्नाटक राज्यातले सगळेच मुस्लीम गरीब आहेत का? सगळ्यांनाच कसलीच संधी मिळालेली नाही का? हिंदू ओबीसी समाजाचा हक्क लुटणार्यार राहुल गांधी आणि काँग्रेसचा हा सामाजिक न्याय त्यांनाच लखलाभ
 
 
हातात केवळ रडणे आहे
 
 
८१ वर्षांचे काँगसचे अध्यक्ष मल्लीकार्जुन खर्गे म्हणाले की, “मी भाजप आणि रा. स्व. संघाच्या विचारसरणीला हरविण्यासाठी जन्माला आलो.” पण मल्लीकार्जुन खर्गे यांचा भूतकाळ पाहिला की वाटते, त्यांनी भाजप किंवा रा. स्व. संघाच्या विचारसरणीला हरविण्यापेक्षा रझाकारांच्या हिंस्त्र आणि देशविघातक मानसिकतेला हरविण्यासाठी जन्म घेतला, असे एकदातरी म्हणायला हवे होते. कारण, १९४८ साली खर्गेंच्या आई-बहिणीला रझाकारांनी जिवंत जाळले होेते. मल्लिकार्जुन तेव्हा सात वर्षांचे होते. त्यांची आई आणि बहीण घरात असताना त्या घराला रझाकारांनी आग लावली. त्या आगीतच दोघींचा होरपळून मृत्यू झाला.
 
मात्र, या रझाकार हिंसक मनोवृत्तींना संपवेन किंवा जिहादच्या नावावर समाज, देशाला त्रास देणार्यांहविरोधात मी काम करीन, असे म्हणताना मल्लिकार्जुन खर्गे कधीच दिसत नाहीत. आई-बहिणीचा जीव घेणार्या, नीच मनोवृत्तीविरोधात मूग गिळून बसायचे, सोयीस्कर दुर्लक्ष करायचे, उलट त्याच विचारसरणीपुढे केवळ मतांसाठी लाचारी पत्करायची, हे आजपर्यंत मल्लिकार्जुन यांचे कर्तृत्व म्हणावे का? हे सगळे पाहून वाटते की, रझाकारांनी लावलेल्या आगीतून त्यांची आई आणि बहीण वाचल्या असत्या तर?
 
आज त्या हयात असत्या, तर कनार्टकमधे काँग्रेसने सरसकट मुस्लिमांना ओबीसीमधून आरक्षण जाहीर केले, तरीही मल्लीकार्जुन खर्गे गप्प बसले, यावर त्या आई-बहिणीने खर्गेंना भूतकाळाची आठवण करून दिली असती. कारण, त्या धर्मांधांच्या हिंसक वेडाच्या बळी होत्या. असो, कलबुर्गीमध्ाून खर्गे अनेकवेळा विजयी झाले होते. २०१९ साली मात्र, मोदी लाटेपुढे त्यांची गच्छंती झाली. यावेळी काँग्रेसतर्फे मल्लिकार्जुन खरगे यांचे जावई राधाकृष्ण डोडड्ामणी हे उमेदवार आहेत. मात्र, जावईबुवा जिंकतील, याची शाश्वती खर्गेंनाही नाही. त्यामुळे, या मतदारसंघात मत मागताना खर्गे म्हणतात,“काँग्रेसला मत द्या किंवा नका देऊ, पण माझ्या अंत्यसंस्कारालातरी नक्की या.” हाय रे देवा! किती ती असाहाय्यता! स्वतःच्या अंत्यसंस्काराच्या बाता आता खर्गेंना कराव्या लागतात. खर्गे यांनी देशद्रोही, समाजविघातक शक्तींना विरोध केला असता, तर त्यांच्यावर ही अशी वेळ आली नसती. पण, आता वेळ निघून गेली आहे. भाजप रा.स्व.संघाच्या नावाने रडणे, एवढेच त्यांच्या हातात आहे.
 
 
९५९४९६९६३८

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.