तामिळनाडूत भाजपला मतदान केले म्हणून महिलेची हत्या; अन्नामलाईंनी डीएमकेवर केले गंभीर आरोप

    23-Apr-2024
Total Views |
 tamilnadu
 
चेन्नई : भाजपला मतदान केल्यामुळे एका महिलेची हत्या करण्यात आल्याचा आरोप भाजप तामिळनाडूचे अध्यक्ष के अन्नामलाई यांनी केला आहे. अन्नामलाई यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर (आधी ट्विटरवर) महिलेच्या कुटुंबासोबतच्या संवादाचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये महिलेचे कुटुंबीय हत्येचे कारण काय अशी चर्चा करताना दिसत आहेत.
 
अन्नामलाई यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओनुसार, मृताचा पती आणि काही नातेवाईक बोलत आहेत. यामध्ये एका व्यक्तीचे म्हणणे आहे की पोलिसांनी महिलेच्या हत्येचे कारण २०२१ मध्ये झालेल्या भांडणाचे दिले आहे. मतदानाच्या दिवशी हाणामारी झाल्याचे पोलिसांचे म्हणणे होते, मात्र त्यामागे जुने भांडण हे कारण होते. पोलिसांनी केलेल्या दाव्यानुसार, कमळाच्या चिन्हावर मतदान केले म्हणून हत्या करण्यात आली नाही. तर हत्येसाठी जुने भांडण हे कारण आहे.
 
 
व्हिडिओमध्ये दुसरा व्यक्ती बोलतो, पोलिसांचा दावा पूर्णपणे खोटा आहे. पोलिसांचे हे वक्तव्य त्यांच्या वेगळ्या उद्देशाने दिले गेले आहे. यानंतर एका व्यक्तीने स्पष्ट प्रश्न विचारला की, महिलेने कमळाला मत दिल्याने भांडण सुरू झाले. याला मागून बोलणारी व्यक्ती सहमत आहे. दुसरी व्यक्ती सांगते की, महिलेचे मत कमळला जाईल हे विरोधकांना माहीत होते.
 
 
 
त्यानंतर आणखी एक व्यक्ती म्हणतो की, भाजपला मतदान करत आहे. म्हणून महिलेची थट्टा उडवण्यात आली. तिला आधी त्रास दिला आणि तीची हत्या केली. पण पोलिसांनी चुकीची बाजू पुढे आणखी. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती स्पष्टीकरण देत आहे की, जर पूर्वीचे वैर असते तर मतदानाच्या दिवशीच का भांडण झाले. चार दिवस आधी किंवा चार दिवसांनी भांडण झाले असते. महिलेने भाजपला मतदान केल्यामुळे तिची हत्या झाल्याचे त्या व्यक्तीने स्पष्टपणे सांगितले.
 
हे वाचलंत का? -  सपाच्या काळात पोलिस स्टेशनच्या जागेवर बांधला मकबरा; योगी सरकारने लेखपाल मोहम्मद सईदवर केली कारवाई
 
अण्णामलाई यांनी तामिळनाडूच्या द्रमुक सरकारवर आरोप केला की सत्य समोर आणण्यासाठी त्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे. ते म्हणाले की, फॅसिस्ट द्रमुक एफआयआर आणि खोट्या केसेस लावून त्यांचा आवाज दाबू शकत नाही. मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सत्तेत काही दिवस उरले असून तोपर्यंत ते हवे तेवढे खटले दाखल करू शकतात, असे ते म्हणाले.
 
काय आहे संपूर्ण प्रकरण?
भाजपला मत देणाऱ्या गोमती नावाच्या महिलेवर डीएमकेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला आणि तिला बेदम मारहाण केली, असे स्थानिक मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. यात महिलेचा जागीच मृत्यू झाला. मात्र, तामिळनाडू पोलिसांनी या प्रकरणाबाबत सांगितले होते की, महिलेची हत्या मतदानाच्या कारणावरून नव्हे तर वैयक्तिक वादातून झाली आहे.
 
ही घटना तामिळनाडूच्या कुड्डालोर जिल्ह्यातील पक्कीरीमनियाम गावात घडली. तिने भाजपला मतदान केल्याचे समजल्यानंतर डीएमकेचे समर्थक गुंड गोमथी यांच्या घरी आल्याचे दिनमलार यांनी सांगितले. त्यांचा पीडितेसोबत जोरदार वाद झाला, त्यानंतर गुंडांनी तिला बेदम मारहाण केली. "तुम्ही आमच्या पक्षाला (डीएमके) मत का दिले नाही?" असा प्रश्न ते तिला विचारत होते.
 
तर तामिळनाडू पोलिसांनी अशी कोणतीही घटना घडलेली नाही, असा दावा केला आहे. तामिळनाडू पोलिसांनी ही बातमी फेक असल्याचे म्हटले आहे. प्रदीर्घ काळ सुरू असलेली याचिका मागे घेण्यावरून दोन्ही पक्षांमध्ये वाद झाल्याचे पोलिसांनी सांगितले. तामिळनाडू पोलिसांचे म्हणणे आहे की, या घटनेचा कोणत्याही पक्षाला मतदान करण्याशी काही संबंध नाही आणि हा वैयक्तिक वादाचा विषय आहे.