मुंबई तरुण भारत विशेष: दूरदर्शन'चा बदललेला रंग अन् डाव्यांना पोटशूळ!

    22-Apr-2024
Total Views |

DD News
 
 
मोहित सोमण
 
दूरदर्शनने आपले ब्रँडिग नवीन काय केले तर अनेकांना त्यातही पोटशूळ उठला आहे. केशरी अथवा भगवा हा रंग समृद्धीचा आहे हे अनेक कपाळकरंटे विसरले आहेत. फक्त दूरदर्शनचा लोगो बदलला म्हणून भारतातील अनेकांना फारच दुःख झालेले दिसत आहे.भगवा हा खुपणारा रंग असतोच फक्त अशा प्रकरणातील खदखदत असणारे चेहरे यानिमित्ताने जाणवतात. इतर धर्मीय नाहीत अनेक हिंदूनांच भगवा रंग खुपतो. अशा लोकांना एकच विचारावेसे वाटते पाकिस्तान हा इस्लामिक डेमोक्रॅटिक देश आहेत तिथे जाऊन त्यांच्याही लोगोत केशरी रंग टाकावा अशी मागणी तिकडे कराल का? हा मुख्य प्रश्न आहे.
 
दूरदर्शनकडून स्पष्टीकरण येऊन सुद्धा अनेकांना विरोधाला विरोध करावा वाटतो. का तर केवळ भगवा हे हिंदूचा रंग म्हणून. भारताबाबत अनेकदा असे म्हटले जाते की भारताला बाहेरील दुश्मनांची गरज नाही देशांतर्गत अनेक कपाळकरंटे आहेत.विरोध करणे हा प्रकार नसून आता विकार झाला आहे? असो... तर मुद्दा असा की दूरदर्शनच्या बाबतीत प्रसार भारतीचे सीईओ (मुख्य कार्यकारी अधिकारी) गौरव द्विवेदी यांनी एका मुलाखतीत आम्ही हा एक ब्रँडिंग डिझाईन,अस्थेटिक्सचा भाग म्हणून या रंगाची निवड केली आहे. पूर्वी लाल रंगातील लोगो आता केशरी झाल्याने काही लोकांना चघळायला नवीन विषय मिळाला की कसा हिंदूत्वाचा प्रचार केला जात आहे व कसे देशाचे भगवेकरण केले जात आहे.जर हा इतका रंग खटकत आहे तर आधी लाल रंग असल्यावर यातल्या किती जणांनी हा रंग कम्युनिस्टांचा आहे म्हणून विरोध केला? हे तर आपल्याला ऐकीवात नसेल परंतु कुठल्याही बाबतीत केवळ भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे म्हणून भगवेकरणाचा आरोप करायचा हा पॅटर्न आता शिळा झाला आहे.
 
लोक हा मुद्दा गांभीर्याने घेत नसले तरी वेळेला होणारी कोल्हेकुई समाजासमोर आणणे आवश्यक ठरले आहे. तिकडून पाकिस्तानातून इकडची गंमत बघणारे अशा घटनांचा चवीने आस्वाद घेत असतात. प्रश्न लोकशाहीचा नाहीच आहे.इकडची लोकशाही व संविधान घालवणे कोणालाच शक्य होणार नाही.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बनवलेले सर्वांग सुंदर संविधान कायम अबाधित राहणार आहे. परंतु केवळ भगवा रंग आहे म्हणून विरोध करायची प्रवृत्ती ही विरोधकांना येते कुठून हा लोकांना सवाल आहे.
 
एखाद्या उत्पादनाचे ब्रँडिंग डिझाईन कुठल्याही धर्माचा भाग नसतो. एखाद्या सवाष्ण म्हणून आलेल्या स्त्रियांनी हिरवी साडी नेसली तर त्यांनी इस्लाम स्वीकारला असे म्हणायचे का? सर्वात प्रथम रंगांना धार्मिकतेचा ज्वर देणे बंद झाले पाहिजे.तथाकथित पुरोगामी व्यक्तींना केवळ हिंदूना झोडपण्यात मोठा पराक्रम वाटतो. हा पराक्रम दुसऱ्या देशात जाऊन सेक्युलर लोक का करत नाहीत? हा भगवा रंग भागवत धर्मांचा रंग आहे.भारतीयांचा अस्तित्वाचा संत परंपरेतील हा रंग आहे हा कुठल्या जाती धर्माचे प्रतिक नाही. परंतु निवडणुकाजवळ आल्यावर दूरदर्शनचा उहापोह करणे अपेक्षितच होते.
 
मात्र असे बोलणारे या निमित्ताने 'एक्स्पोज' झाले आहेत हे निश्चित आहे.भारतातील अंतर्गत विरोध करणारे हे कायम शिक्षणाचे भगवेकरण, व्यवसायाचे भगवेकरण, अन्नाचे भगवेकरण आता दूरदर्शनचे भगवेकरण अशी आरोळी ठोकत असतात. त्यांना हा दूरदर्शनचा बदललेला रंग आवडलेला दिसत नाही.परंतु भारतातील बहुतांश लोकांच्या मनात असलेला हा सौभाग्याचा व भारत भाग्यविधाता ' भगवा' रंग आवडला आहे.एक मात्र चांगली बाब घडत आहे तर म्हणजे अशा सोशल मिडियातील उठाठेव करत असलेल्या रिकाम्या विरोधकांमुळे नवीन मुद्यांना फोडणी घातली जात आहे.त्यानिमित्ताने हे विरोधक जितका विरोध करतील तितके हे विरोधक उघडे पडत आहे.
 
दूरदर्शनचा लोगो हा केवळ दिखावा आहे.किंचित प्रसिद्धीसाठी देशाला देशाबाहेर जाऊन विरोध करणाऱ्या लोकांना हा विरोधाचे नवे हाडूक मिळाले आहे. आता गेला १ महिना भारतात कशी हुकुमशाही आली आहे अशा शंभर कथा आपण ऐकल्या असतील त्यात ही लोगोची नवीन भर ! दोन मिनिटांसाठी मानू की डीडीची रंग भगवा केला आहे त्यात वाईट घडलंय कुठे?
 
ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगायचे झाले तर १९५९ साली दूरदर्शनची स्थापना झाली तेव्हा दूरदर्शनचा रंग भगवाच होता कालांतराने तो पिवळा, निळा, लाल होत गेला. कारण कदाचित तेव्हाचे सरकार सेक्युलर असल्याने भगव्या रंगाची बाधा झालेली असेल. याशिवाय नव्या नियमानुसार आता दूरदर्शनचे वार्ताहर खादी कपड्यात दिसतील.भारतासाठी ही तर अभिमानाची गोष्ट आहे. जगभर देशाचे राष्ट्रपिता यांनी नेहमी खादी कपड्यांचा प्रचार प्रसार केला. आता यालाही विरोध करायला कपाळकरंटे पुढे येतील पण देश अब झुकेगा नहीं रुकेगा नहीं !विकासाबरोबरच आत्मसन्मान आवश्यक आहे.
 
काही लोकांनी आता विरोध केला तरी देश आता फक्त विकासाकडे वाटचाल करणार आहे. जे जे सकारात्मक असेल ते ते भारत अंगिकारणार आहे.बदललेला लोगो कदाचित विकासाचे प्रतिक म्हणून घ्यायला हरकत नाही.पण विरोधकांचे हिंदुद्वेषी रडगाणे जुनेच असल्याने या निमित्ताने हा मुद्दा फारसा नागरिकांनी गांभीर्याने घेण्याची गरज नाही.