मुंबई: आज सोने गुंतवणूकदारांना चांगली गुंतवणूकीची संधी आली आहे. गेल्या महिन्यात सतत वाढत असलेल्या सोन्याच्या किंमती आज मात्र थंडावल्या आहेत.गेले काही दिवस सराफा बाजारात सोने किंमतीत मोठे चढ उतार पहायला मिळाला आहे. या अनुषंगाने आज देशातील सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. देशात सरासरी प्रति ग्रॅम किंमतीत ५० रुपयांनी घट झाली आहे.
आज देशातील २२ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति ग्रॅम ५० रुपयांनी घट झाली असून प्रति १० ग्रॅम सोन्याच्या किंमतीत ५०० रुपयांनी घट झाली आहे.२४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति ग्रॅम ५५ रुपयांनी घट झाली आहे. २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅम दरात ५५० रूपयांनी घसरण झाली आहे. १८ ग्रॅम सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम ४१० रुपयांनी घट झाली आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील सोन्याच्या स्पॉट दरात १.२५ टक्क्यांनी घट होत २३६१.२५ रुपये दर झाला आहे. भारतातील एमसीएक्स (Multi Commodity Exchange) मधील सोन्याच्या निर्देशांकात १.२१ टक्क्यांनी घट झाली असून एमसीएक्सवरील सोन्याचे दर ७१९२२.०० पातळीवर पोहोचले आहेत.
मुंबईतील २२ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति ग्रॅम किंमत ५० रुपयांनी घटली आहे. २२ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅम दरात ५०० रूपयांनी घट झाली आहे.२४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति ग्रॅम ५५ रुपयांनी घसरण झाली आहे. २४ कॅरेट सोन्याच्या प्रति १० ग्रॅम दरात ५५० रुपयांनी घट झाली आहे. १८ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम ४१० रूपयांनी घट झाली आहे.
चांदीच्या दरातही घसरण
चांदीच्या दरात प्रति १० ग्रॅम १० रुपयांनी व १ किलो चांदीत १००० रूपयांनी घसरण झाली आहे.काल चांदीचे भाव प्रति किलो भावात ८६५०० होते. आज ते १००० रुपयांनी घटत ८५५०० रुपयांवर आले आहेत.