‘शेवटच्या युद्धाची वेळ आली आहे!’; ‘अश्वत्थामा’च्या दमदार भूमिकेत अमिताभ बच्चन

    22-Apr-2024
Total Views |
हिंदी चित्रपटसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन यांचा आजपर्यंत कधीबी न पाहिलेला हटके लूक समोर आला आहे.
 

amitabh bachchcan 
 
मुंबई : बहुचर्चित ‘कल्कि 2898 एडी’ (Kalki 2898 AD) या चित्रपटातील महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा ‘अश्वत्थामा’चा पहिला लूक समोर आला आहे. नुकताच या चित्रपटातीचा एक टीझर देखील प्रदर्शित करण्यात आला. यात ‘अश्वत्थामा’च्या भूमिकेत अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) दिसत असून त्यांचा आजवर कधीही न पाहिलेला असा दमदार लूक पाहायला मिळत आहे.
 
वयाची ८० वर्ष पार केली असली तरी अमिताभ बच्चन आजही नव्या भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या ‘कल्कि 2898 एडी’ मधील बच्चन यांचा हा लूक स्वत: त्यांनीच शेअर देखील केला आहे.
 

amitabh bachchcan 
 
दरम्यान, या चित्रपटाच्या टीझरमध्ये अमिताभ बच्चन आणि एका लहान मुलांचे संवाद ऐकू येतात. व्हिडीओत अमिताभ बच्चन यांचे संपूर्ण शरीर पांढऱ्या कपड्याने झाकलेले दिसत असून केवळ त्यांचे डोळे दिसतात. ते शिवलिंगाची पूजा करत असताना एक मुलगा त्यांच्याकडे येतो आणि म्हणतो, ‘हाय…मी राया आहे.’ यानंतर तो अश्वथामाला बरेच प्रश्न विचारतो. मग अश्वत्थामाच्या कपाळातून रक्त येतं आणि मुलगा म्हणतो, ‘तू देव आहेस?’ यावर ते म्हणतात, ‘आता वेळ आली आहे, माझ्या शेवटच्या युद्धाची वेळ आली आहे.’ यानंतर ते स्वत:ची अर्थात अश्वत्थामाची ओळख सांगतात. सध्या या टीझरने धुमाकूळ घातला आहे.
 

amitabh bachchcan 
 
'कल्की 2898 AD' या चित्रपटाचे दिग्दर्शन नाग अश्विन यांनी केले आहे. या चित्रपटात पुन्ह एकदा दाक्षिणात्य आणि हिंदी कलाकारांची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात अमिताब बच्चन यांच्यासह प्रभास, कमल हासन, दीपिका पडूकोन यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत.