अबू आझमींकडे कोट्यवधींची बेनामी संपत्ती; ईडी, सीबीआय चौकशी करणार?

किरीट सोमय्यांचा दावा; चौकशी करण्याची ईडी, सीबीआयकडे मागणी

    20-Apr-2024
Total Views | 101
 abauu ajamai
 
मुंबई : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमींकडे कोट्यवधींची बेनामी संपत्ती असून, त्यांनी जवळपास ३०० कोटी रुपयांहून अधिक रकमेचे अपारदर्शक व्यवहार केल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. यासंदर्भात सखोल तपास करण्याची मागणी करीत शुक्रवार, दि. १९ एप्रिल रोजी त्यांनी सीबीआय आणि ईडीच्या महासंचालकांना पत्र लिहिले आहे.
 
अबू आझमी यांचे हात आर्थिक अफरातफर, पार्किंग घोटाळ्यात गुंतलेले आहेत. शिवाय त्यांनी ३०० कोटींहून अधिक रकमेचे अपारदर्शक आर्थिक व्यवहार केल्याचे सोमय्यांनी पत्रात नमूद केले आहे. कुलाबा परिसरातील पगडी इमारती, वांद्र्यातील झोपडपट्ट्या, वाराणसीमधील विनायक निर्माण ग्रूप यांसह अनेक आस्थापने आणि व्यक्तींशी त्यांनी बेनामी व्यवहार केले आहेत. यात कोट्यवधींच्या रोख रकमेची देवाणघेवाण झाल्याचा आरोपही सोमय्यांनी केला आहे.
 
दरम्यान, याप्रकरणी अबू आझमी आणि त्यांच्याशी संबंधित स्वयंसेवी संस्था, दहशतवादी झाकीर नाईकची शाळा यांच्यात झालेल्या आर्थिक व्यवहार, तसेच मुंबईतील खिचडी घोटाळ्याशी संबंधित व्यवहारांचा सखोल तपास करावा, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121