नवी दिल्ली : इस्रायलने इराणच्या काही लष्करी ठिकाणांवर ड्रोन हल्ले केले आहेत. इराणच्या इस्फहान प्रांतात हा इस्रायली हल्ला झाला. इराणने इस्फहान प्रांतातील विमानतळ आणि इराणी लष्करी उपकरणे यांना लक्ष्य केल्याची माहिती काही वृत्तसंस्थांनी दिली. या हल्ल्यात अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे माहिती नाही. इराणने म्हटले आहे की हा हल्ला खूपच छोटा होता आणि त्यात कोणतेही नुकसान झाले नाही.एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलने दि.१९ एप्रिल २०२४ रोजी सकाळी हा हल्ला झाला. . इस्रायलने ड्रोनच्या माध्यमातून हा हल्ला केला आहे. इराणी मीडियाचे म्हणणे आहे की, इस्रायली हल्ला यशस्वी झाला नाही कारण त्याने इस्रायली ड्रोन हवेतून खाली पाडले.
इस्फहानमध्ये दि. १९ एप्रिल रोजी जोरदार स्फोटांचे आवाज ऐकू आले. इराणमधील इस्फहान विमानतळाला लक्ष्य करून इस्त्रायली हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यानंतर इराणमधील मोठ्या शहरांमधील विमानतळे बंद करण्यात आली असून हवाई उड्डाणांवरही बंदी घालण्यात आली आहे. इराणची राजधानी तेहरानलाही याचा फटका बसला आहे.इराणी स्पेस एजन्सीचे प्रमुख, ट्विटरवर इस्रायली हल्ल्याबद्दल बोलताना म्हणाले की, हे हल्ले ड्रोनद्वारे केले गेले ज्यामुळे कोणतेही नुकसान झाले नाही. इराणच्या सरकारी मीडियाने म्हटले आहे की देशाच्या सुरक्षा दलांनी तीन ड्रोन पाडले. ज्या ठिकाणी हा हल्ला झाला तो इराणी लष्कराचा प्रमुख तळ असल्याचे मानले जाते.
हा इस्रायलचा हल्ला क्षेपणास्त्र हल्ला होता, असा दावा काही बातम्यांनी केला आहे. मात्र, याची अद्याप पुष्टी झालेली नाही. अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितले की, इस्रायली हल्ल्याची माहिती २४-४८ तास अगोदर देण्यात आली होती. इराणच्या आण्विक केंद्रांभोवती इस्रायलचा हा हल्ला करण्यात आला आहे. मात्र, इराणच्या अणुकार्यक्रमाला कोणतीही हानी झालेली नाही.इस्रायलचा हा हल्ला इराणच्या हल्ल्याला प्रत्युत्तर मानला जात आहे. इराणने नुकतेच इस्रायलवर सुमारे ३०० ड्रोनने हल्ला केला. इराणने इस्रायलमधील अनेक शहरांना लक्ष्य केले होते. इराणनेही इस्रायलवर क्षेपणास्त्रे डागली. इस्रायलने सर्व ड्रोन हवेतच पाडले होते.इराण आणि इस्रायलमधील हा तणाव १ एप्रिलपासून सुरू झाला आहे. इस्रायलने १ एप्रिल रोजी सीरियातील इराणी दूतावासाला लक्ष्य केले होते. इस्रायलने या दूतावासावर हवाई हल्ला केला होता. या हवाई हल्ल्यात इराणचे अनेक वरिष्ठ लष्करी अधिकारी मारले गेले. यानंतर इराणने बदला घेण्याची चर्चा केली होती.