मुंबई: मुकेश अंबानी यांचा 'लोटस' या चॉकलेट ब्रँडला आर्थिक वर्ष २०२२३-२४ मधील चौथ्या तिमाहीत १.१८ कोटींचा नफा झाला आहे. कंपनीचे एकूण महसूल ६५.८२ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. मागील आर्थिक वर्षात कंपनीचे एकूण महसूल उत्पन्न ५१.९० कोटी रुपये होते.यावेळी उत्पन्नात २६.८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
आज क्रिसील,डेन नेटवर्क, लोटस चॉकलेट यांचा चौथ्या तिमाही निकाल जाहीर होणार आहे. यामध्ये लोटस कंपनीचा तिमाही निकाल जाहीर झाला आहे.आज Q४ (चौथ्या तिमाहीत) निकाल जाहीर होणार असल्याने लोटस कंपनीचा समभाग काल बाजारात १४ टक्क्याने वाढला होता.
आर्थिक वर्षात कंपनीचे उत्पन्न ६६.०३ कोटींपर्यंत वाढले मागील ५२.२८ लाखांच्या तुलनेत या आर्थिक वर्षात ही वाढ ६६.०३ कोटींपर्यंत वाढले आहे. मागील आर्थिक वर्षात कंपनीचा एकूण खर्च ५१.७६ कोटी होता. या वर्षी त्यात २४ टक्क्यांनी वाढ होऊन ६४.५४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
रिलायन्स रिटेल व्हेंचर समुहाची उपकंपनी ' रिलायन्स कनज्यूमर प्रोडक्टसने लोटस चॉकलेट कंपनीतील ५१ टक्क्यांचे भागभांडवल खरेदी केले. मे २०२४ पासून कंपनीने लोटस कंपनीचे संपूर्ण नियंत्रण रिलायन्स समुहाने मिळवले होते. डिसेंबर २०२२ मध्ये ही डील दोन्ही कंपन्यांनी घोषित केले होते.