२०२४ मध्ये भारताची अर्थव्यवस्था ६.५ टक्क्याने घोडदौड करणार - यु एन अँड ट्रेड डेव्हलपमेंट अहवाल

UNCTAD अहवालात बहुराष्ट्रीय कंपन्यांचा उत्पादनासाठी भारताकडे कल असल्याचे नमूद

    17-Apr-2024
Total Views |

UNTCAD
 
 
मुंबई: युएन (United Nations) ने दिलेल्या अहवालात, भारत ६.५ टक्के दराने वाढू शकते असे भाकीत केले आहे. मोठया बहुराष्ट्रीय कंपन्यांनी (MNC) आपल्या उत्पादनात वाढ केली आहे. तसेच भारतात वाढलेल्या सप्लाय चेन प्रणालीमुळे भारताच्या निर्यातीत सकारात्मक परिणाम होणार असल्याचे युएनने म्हटले आहे. यु एन अँड ट्रेड डेव्हलपमेंट (UNCTAD) ने गुरूवारी आपला अहवाल सादर केला.
 
या अहवालात नमूद केल्याप्रमाणे भारताच्या अर्थव्यवस्थेत ६.७ टक्क्यांनी वाढ होणार आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये ही वाढ ६.५ टक्क्यांनी होणे अपेक्षित असल्याचे देखील यात म्हटले आहे. या अहवालानुसार भारत जगातील वेगवान अर्थव्यवस्था म्हणून उदयास येणार आहे.
 
अहवालात म्हटल्याप्रमाणे भारताच्या अर्थव्यवस्थेतील वाढलेले उत्पादन व किरकोळ मागणीत झालेली वाढ व वाढलेल्या जनतेसाठी वाढलेल्या भांडवली गुंतवणूकीने मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्याने परिणामी भारतातील निर्यातीत वाढ झाल्याचे म्हटले आहे.आर्थिक वर्ष २०२४ मध्ये या गोष्टी अर्थव्यवस्थेतील वाढ कायम ठेऊ शकतात.
 
गेल्या काही वर्षांत बहुराष्ट्रीय कंपन्यांनी भारतातील उत्पादनात वाढ केली आहे. वाढलेल्या उत्पादनामुळे वस्तूंची देवाण घेवाण व सप्लाय चेनमधील झालेली वाढ पाहता भारतातून वस्तू निर्यात होण्याचे प्रमाण वाढले आहे. निर्यातीत वाढ झाली असताना दुसरीकडे आयातीत घट झाली आहे. घटलेल्या आयातीमुळे वस्तूंचे भाव आटोक्यात राखण्यास भारताला यश मिळाले आहे.
 
मागील आठवड्यात फायनान्सिंग फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट (Financing for Sustainable Development) या अहवालात दक्षिण आशिया व भारतात गुंतवणूकीत वेग कायम राहू शकतो असे म्हटले गेले होते.
 
जगभरातील बहुराष्ट्रीय कंपन्यांचा गुंतवणूकीसाठी कल भारताकडे दिवसेंदिवस वाढत आहे. विकसित राष्ट्रांपेक्षा बहुराष्ट्रीय कंपन्या आपल्या सप्लाय चेन प्रणाली भारतासारख्या विकसनशील देशात वळवत असल्याने चीनपेक्षा विकसित राष्ट्रांना भारतासारखा देश पर्याय दिसू लागला आहे. परिणामी भारतातील उत्पादनात वाढ झाल्याने त्याचा फायदा भारतातही दिसत आहे.
 
या अहवालानुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आगामी काळातही व्याजदर न बदलता स्थिर ठेवू शकतो. जेणेकरून ग्राहकांच्या हातात पैसा असल्यास ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे खर्च केले जाऊ शकतात. यातून सार्वजनिक क्षेत्रातील गुंतवणूकीत वाढ होण्याची शक्यता आहे.
 
जगाच्या अर्थव्यवस्थेत आर्थिक वर्ष २०२४ मध्ये २.६ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. २०२३ या आर्थिक वर्षातील २.७ टक्यांच्या तुलनेत ही वाढ किंचित कमी असणार आहे. या अहवालात म्हटल्याप्रमाणे, जगभरातील आव्हानामुळे अर्थव्यवस्था तुलनेने खुंटली होती जी वेगाने वाढवण्यात अपयश आले होते.
 
तंगी आलेल्या अर्थव्यवस्थेत चीन, भारत, इंडोनेशिया, रशिया, अमेरिका या देशातील अर्थव्यवस्थेत वाढ झाल्याने जागतिक आव्हानांचा परिणाम अर्थव्यवस्थेवर कमी झाला आहे. जगाची अर्थव्यवस्था २.७ टक्क्यांनी वाढली आहे.
 
या अहवालाव्यतिरिक्त आयएमएफच्या अहवालातही भारताची अर्थव्यवस्था ६.५ टक्यांच्या ऐवजी ६.८ टक्क्याने वाढेल असे नमूद केले होते. व आर्थिक वर्ष २०२५ मध्ये ६.५ टक्क्यांनी वाढणार असल्याचे म्हटले होते. आयएमएफच्या अहवालानुसार भारतातील घरगुती उत्पादनात मोठी वाढ व नोकरी व्यवसायक्षम असलेल्या लोकसंख्या वाढीमुळे तुलनेने ही दरवाढ झाल्याचे म्हटले होते.