रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंघम अगेन चित्रपटात आता लेडी प़ॉलिस ऑफिसर दीपिका पडूकोण धमाल करताना दिसणार आहे.
मुंबई : दीपिका पडूकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंग यांनी फेब्रुवारी २०२४ मध्ये आई-वडिल होणार असल्याची घोषणा केली होती. ही गुडन्युज ऐकल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला होता. दरम्यान, गरोदरपणातही दीपिका (Deepika Padukone) तिच्या आगामी ‘सिंघम अगेन’ चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त असून बेबी बंप फ्लॉंट करत असतानाचे तिचे फोटो सध्या सोशल मिडियावर लक्ष वेधत आहेत.
रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समध्ये दीपिका पडूकोणची एन्ट्री झाली असून त्याचे दिग्दर्शन असणाऱ्या या चित्रपटाच्या शुटींगचे फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. विशेष म्हणजे या फोटोत ४ महिन्यांची गरोदर असलेली दीपिका बेबी बंप फ्लॉंट करत पोलिसांच्या खाकी वर्दीत दिसत आहे. डोळ्यावर गॉगल लावून दीपिकाचा डॅशिंग पोलीस अधिकाऱ्याचा लूक पाहायला मिळत आहे.
‘सिंघम अगेन’ या चित्रपटात दीपिका शक्ती शेट्टी हे पात्र साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाची विशेष खासियत म्हणजे गरोदर असूनही दीपिका स्टंट करताना दिसणार आहे. १५ ऑगस्ट २०२४ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून प्रेक्षक आतुरतेने या चित्रपटाची वाट पाहात आहेत.