मुंबई: जागतिक मंदीची साशंकता असतानाही आज क्रूड तेलाच्या किंमतीत आंतरराष्ट्रीय स्तरावर कपात झाली आहे. घटलेली मागणी, युद्धजन्य परिस्थितीत शांतता निर्माण झाल्याने व लवकर युएस व्याजदरात कपातीची शक्यता धूसर झाल्याने काही प्रमाणात बाजारात क्रूड तेलाच्या किंमतीत स्थैर्य प्राप्त झाले आहे.
आज सकाळी क्रूड तेलाच्या (कच्च्या तेलाच्या) WTI Future निर्देशांकात ०.४६ टक्क्यांनी घट झाली आहे. तसेच क्रूड तेलाच्या ब्रेंट (Brent) निर्देशांकात ०.४२ टक्क्यांनी घट झाली आहे.आज सकाळच्या सत्रात एमसीएक्स बंद राहणार असला तरी काल क्रूड तेलाच्या निर्देशांकात ०.०१ टक्क्यांनी वाढ होत तेल ७१०२ रूपये प्रति बॅरेल रुपयांवर पोहोचले होते.
इस्त्राईल इराणला प्रत्युत्तर दिल का या मुद्यावर गुंतवणूकदारांनी आखडता हात घेतला आहे. एकूणच क्रूड तेलाच्या खरेदीत घट झाली आहे. चीनमध्ये आर्थिक स्थिती संमिश्र राहिल्याने क्रूड तेलाच्या भावात फरक पडलेला दिसत नाही. चीन हे तेलाचे सर्वात मोठे आयातदार आहे. चीनच्या अर्थव्यवस्थेत वाढ झाली असली तरी रियल इस्टेट व त्यातील गुंतवणूकीत घट झाली आहे. यामुळे या एकूण बाजारी परिणाम क्रूड तेलाच्या किमतीत झाला आहे.