"...आणि मला कुणीही किडनॅप केलं असतं”, अमृताने सांगितला द.अफ्रिकेतील शुटींगचा किस्सा

    13-Apr-2024
Total Views |
‘लुटेरे’ या वेब सीरीजमध्ये अमृता खानविलकर झळकली होती. त्याच्या शुटींगचा एक भयावह किस्सा तिने सांगितला.
 

amruta khanwilkar 
 
मुंबई : 'चंद्रा' या गाण्यामुळे अधिक लोकप्रिय झालेली अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) सध्या अनेक हिंदी प्रोजेक्ट्समध्ये काम करताना दिसत आहे. अभिनय आणि नृत्यकौशल्य यांच्या जोरावर अमृताने (Amruta Khanvilkar) हिंदी मनोरंजनसृष्टीतही नशीब आजमावलं. राझी, मलंग, सत्यमेव जयते यांसारख्या चित्रपटांत ती झळकली आहे. आणि आता लुटेरे या वेब सीरीजच्या माध्यातून तिने ओटीटीवर पदार्पण केले आहे. याच लुटेरे सीरीजच्या शुटींगदरम्यानचा एक भयावह किस्सा नुकताच तिने एका मुलाखतीत सांगितला.
 
अमृता खानविलने मिड -डे ला मुलाखत देताना म्हटले की, लुटेरेचं दक्षिण आफ्रिकेत एका स्लमच्या भागात या वेबसीरिजचं शुटिंग झालं होतं. हा भाग इतका भयानक होता की कधीही कोणत्याही व्यक्तीसोबत काहीही घडू शकत होतं. आम्ही दक्षिण आफ्रिकेत शूट करत होतो. आपल्याकडे धारावीचा स्लम एरिया हा आशियातील सर्वात मोठा एरिया आहे आहे. तसाच तो आफ्रिकेतील सर्वात मोठा स्लम एरिया होता. थोडक्यात पृथ्वीवरची सर्वात मोठी झोपडपट्टी. तर ज्यावेळी आम्ही तिथे शुट करत होतो तेव्हा आफ्रिकेत आर्थिक अडचण होती. त्यामुळे तिथे सामान्य लोकंही बंदुका घेऊन फिरायचे".
 
पुढे ती म्हणाली, "शुटिंगच्या पहिल्या दिवशी मी माझ्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये बसले होते. खूप गरम होत असल्यामुळे मी व्हॅनिटीचा दरवाजा उघडा ठेऊन बसले होते. तितक्यात सेटवरुन एक मुलगा पळत आला आणि मला म्हणाला, दरवाजा बंद करुन बसा नाही तर इथून तुम्हाला कोणाही किडनॅप करुन घेऊन जाईल. मग आम्हीही काहीच करु शकणार नाही. त्यावेळी सेटवर अत्यंत भीतीचं वातावरण पसरलं होतं. त्या भागा त माफिया , बेरोजगार आणि गुन्हेगारी खुप वाढली असल्याकारणाने शुटिंग करणं फार असुरक्षित होतं. त्यापेक्षा आपण भारतात खूप सुखी आहोत. आपल्याला जे पाहिजे ते आपण बोलू शकतो, हवं तिथे फिरू शकतो. तिथे असं काहीच नव्हतं”.