मुंबई: सिमेंट उद्योगात उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी समुहाने आता मोठे लक्ष्य ठेवले आहे. एसीसी व अंबुजा सिमेंटच्या अधिग्रहणानंतर आता देशातील एकूण सिमेंट उद्योगातील १/५ हिस्सा (Market Share) राखण्याचे ठरवले आहे.
अदानी सिमेंट व्यवसायात पुनर्बाधणी करण्यासाठी अदानी समुह आपला व्यवसाय वृद्धिंगत करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कंपनी आपल्या भांडवली खर्चात (Capital Expenditures) मध्ये वाढ करण्याची शक्यता आहे. याशिवाय कंपनीचे देय विना (Debt Free) दर्जा राखण्यासाठी कंपनीने कंबर कसली आहे. याबद्दल कंपनीने आपल्या अंतर्गत बैठकीत गुंतवणूकदारांना सादरीकरण केले आहे.
याबाबत कंपनी आर्थिक वर्ष २०२८ पर्यंत भांडवलात वाढ करतानाच १६ टक्क्यांनी आपल्या भांडवली खर्चात वाढ करण्याची शक्यता आहे.एकूण सिमेंट बाजारातील आर्थिक वर्ष २०२७ पर्यंत २० टक्के हिस्सा अदानी सिमेंटचा असावा यासाठी कंपनीचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे
आदित्य बिर्ला समुहाच्या अल्ट्राटेक सिमेंट नंतर दुसरा क्रमांक अदानी सिमेंटचा लागतो. अंबुजा सिमेंटच्या कारखान्याच्या क्षमतेनुसार वर्षाला,७७.४ टन सिमेंट उत्पादन होऊ शकते. कंपनीचे १८ सिमेंट प्रकल्प देशभर आहेत.व १८ ग्रायडिंग युनिट्स देखील आहेत.
आर्थिक वर्ष २०२३ डिसेंबरपर्यंत,अंबुजा सिमेंटच्या आर्थिक स्थितीत मोठी वाढ झाली आहे. कंपनीवर कुठलेही कर्ज व थकबाकी नसून कंपनीचे एकूण मूल्यांकन ४३००० कोटी रुपयांपर्यंत आहे. रोखे व इतर मालमत्तेची संख्या ८५९१ कोटी रूपये आहे.