मुंबई : लवकरच लोकसभा निवडणूकांना सुरुवात होणार असून वंचित बहुजन आघाडीची पाचवी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये ९ लोकसभेच्या जागांवर उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. यामध्ये मुंबईतील काही जागांचाही समावेश आहे.
वंचित बहुजन आघाडीने रायगड, नंदुरबार, उस्मानाबाद, जळगाव, दिंडोरी, पालघर, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम आणि मुंबई दक्षिण मध्य इत्यादी जागांवर आपले उमेदवार जाहीर केलेत. तसेच भिवंडीमध्ये वंचित अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या निलेश सांबरे यांना पाठिंबा देणार आहे. वंचितने जाहीर केलेल्या ९ जागांवरील उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे...