मतदान विरोधात कराल तर नंतर बघून घेऊ! मग कर्माला दोष देऊ नका; तृणमुल आमदाराची धमकी

तृणमुल काँग्रेस आमदार हमीदुर रहमानची उघड धमकी

    12-Apr-2024
Total Views |

Hamidur Rahman
 
कोलकाता : लोकसभा निवडणूकीपूर्वी तृणमुल काँग्रेस आमदार हमीदुर रहमाने मतदारांना उघड धमकी दिली आहे. ११ एप्रिल रोजी आपल्या भाषणात उत्तर दिनाजपुर जिल्ह्यातील माझियाली गावात झालेल्या बैठकीत आमदाराने हे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, "केंद्रीय निमलष्करी दल हे फक्त २६ तारखेपर्यंत पश्चिम बंगालमध्ये असतील त्यानंतर तुम्हाला टीएमसी सोबतच रहायचे आहे.", अशा शब्दात आमदाराने उघड धमकी दिली आहे.
 
"त्यामुळे मतं वाया घालवण्याची कुठलाही प्रयत्न करू नका, एकदा का केंद्रीय निमष्करी दलं गेली की तुम्हाला इथेच रहायतं आहे. त्त्यानंतर जे काही घडेल त्यासाठी नशिबाला दोष देत बसू नका. हमीदुर रहमानने यावेळी मतदारांना २०२१च्या विधानसभा निवडणूकांसह पंचायत निवडणूकीवेळी घडलेल्या घटनांचीही आठवण करुन दिली. त्यावेळी 'खेला होबे'च्या आड भाजप कार्यकर्त्यांसोबत जागोजागी हिंसाचार घडवून आणण्यात आला होता.
 
यापूर्वी भाजप कार्यकर्त्यांना हमीदुर रहमानने ‘नमकहराम’ म्हटले होते. निवडणूकीनंतर त्यांनी घोषणा केली होती की, भाजप कार्यकर्त्यांना आम्ही धडा शिकवू. त्यावेळी आमदार रहमान म्हणाला होता की, “आमच्या पूर्वजांनी आम्हाला शिकवलं आहे की, ज्यांनी तुम्हाला अन्न दिलं त्यांच्याशी गद्दारी केली. निवडणूकीनंतर आम्ही त्या त्या लोकांना भेटू ज्यांनी आमच्याशी गद्दारी किली. ममता दिदी मुख्यमंत्री झाल्य़ाच पाहिजेत", असा दब आमदाराने भरला होता. यानंतर भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.

दरम्यान, याही निवडणूकीत तृणमुलचे आमदार सर्वसामान्य जनतेला उघड उघड धमकावत आहेत. दुसरीकडे राज्यात भाजप कार्यकर्त्यांवर हल्ले सुरू झाले आहेत. २४ मार्च रोजी पश्चिम बंगलाच्या दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील कॅनिंग उपखंडातील माथेर दिघी गावात तृणमूल कॉन्ग्रेसच्या गुंडांनी कित्येक भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला चढवला. भाजपच्या कॅनिंग पुरबा मंडल क्रमांक ३ च्या मंडल अध्यक्षांसह अन्य कार्यकर्त्यांवरही हल्ला केला होता. भाजप नेते सुवेंदु अधिकारींनी हुसैन शेख विरोधात तक्रार दाखल केली होती.

त्यापूर्वी २३ मार्च रोजी सकाळी भाजप कार्यकर्ते शंतनू घोराई यांचा मृतदेह जवळच्या शेतात आढळला होता. ही घटना पश्चिम बंगालच्या पश्चिम मेदिनीपुर जिल्ह्यातील खडगपूर उपखंडातील पिंगला गावात घडली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी थेट तृणमुल काँग्रेसवर हत्येचा आरोप लावला आहे. भाजपचे समर्थन केले म्हणून शंतनू घोराई यांना धमकावले जाई.