आजपासून गुंतवणूकदारांसाठी ग्रीनहायटेक कंपनीचा आयपीओ बाजारात

पहिल्या दिवशी ९.८१ वेळा आयपीओत सबस्क्राईब झाले! आयपीओसाठी अंतिम तारीख १८ एप्रिल

    12-Apr-2024
Total Views |

IPO
 
 
मुंबई: आजपासून ग्रीनहायटेक (Greenhitech Limited) कंपनीचा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी खुला होत आहे. आज १२ एप्रिलपासून १६ एप्रिलपर्यंत हा आयपीओ गुंतवणूकीसाठी खुला राहणार आहे. १८ एप्रिलपर्यंत पात्र गुंतवणूकदारांना या आयपीओतील समभागाचे वाटप करण्यात येणार आहे. कंपनीने ५० रूपये प्रति समभाग एवढी किंमत निश्चित केली आहे.
 
कमीतकमी गुंतवणूकीसाठी १५०००० शेअर गुंतवणूकदारांना खरेदी करावे लागणार आहे. ३००० समभागांचा एक गठ्ठा (Lot) असणार आहे. कंपनीच्या समभागाचे दर्शनी मूल्य (Face Value) १० रूपये इतकी आहे. एकूण ६.३० कोटींचे समभाग किरकोळ गुंतवणूकदारांना विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.आयपीओचे लिस्टिंग बीएसई- एसएमई (BSE-SME) प्रवर्गात नोंदवण्यात येणार आहे.
 
अपात्र झालेल्या गुंतवणूकदारांना त्यांचा परतावा १९ एप्रिलपासून सुरू होणार आहे. कंपनी २२ एप्रिलपासून शेअर बाजारात नोंदणीकृत (Listed) होणार आहे. एकूण समभागापैकी ४७ टक्क्याचे किरकोळ समभाग गुंतवणूकीसाठी उपलब्ध असणार आहे.५.२४ टक्यांचे समभाग मार्केट मेकर यांच्यासाठी उपलब्ध असणार आहे.
 
या कंपनीचे प्रमोटर (संस्थापक) नावेद इक्बाल, मोहम्मद नदीम हे आहेत.ग्रीनहायटेक कंपनी पेट्रोलियम पदार्थाची वेगवेगळ्या औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांना विक्री करते.कंपनी प्रामुख्याने सरकारच्या डिस्टीलरीजमध्ये उत्पादीत होणारे इथेनॉलची प्रकिया व देखभाल करते.प्रामुख्याने या बँकेचा कारभार पूर्वांचल उत्तर प्रदेश येथे आहे.
 
कंपनीला ३१ मार्च २०२४ पर्यंत ३५.६४ कोटींची करोत्तर नफा (Profit After Tax) झाला होता. मागील वर्षी हा करोत्तर नफा ५७.२३ कोटी रुपये झाला होता.३१ मार्च २०२३ रोजी कंपनीचे महसूल उत्पन्न ( Revenue) २५०४.३५ कोटी असून यंदा ते कमी होत आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ते ३३५.६७ कोटी रूपये इतके झाले आहे. कंपनीचे एकूण बाजारी भांडवल (Market Capitalisation) २३.५ कोटी इतके आहे.
 
कंपनीकडून सांगण्यात आलेल्या माहितीनुसार,वर्किंग कॅपिटल गरजेसाठी व दैनंदिन कामकाजासाठी या आयपीओतील मिळालेल्या निधीचा वापर केला जाणार आहे. पहिल्या दिवशी ९.८१ वेळा या आयपीओला सबस्क्रिप्शन मिळाले आहे.किरकोळ गुंतवणूकीत १६.५ वेळा, पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून ३.१२ वेळा व एनआयआय ( विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून ३.१२ वेळा सबस्क्राईब केला गेला आहे.