मीरा रोडमध्ये ईदपूर्वी गोहत्या! पोलिसांनी नईम कुरेशीच्या मुसक्या आवळल्या

    12-Apr-2024
Total Views |

Mira Road Gohatya News

मुंबई (प्रतिनिधी) :
मीरा रोड येथील मिनाक्षी नगर परिसरात गोहत्येचा (Gohatya Mira Road) प्रकार घडल्याचे निदर्शनास आले आहे. इस्लामिक सण असलेल्या ईदपूर्वी संबंधित प्रकार घडला असून मिळालेल्या वृत्तानुसार काशीगाव पोलिसांनी नईम सैफ कुरेशी नामक आरोपीला ताब्यात घेतले आहे. अन्य दोन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा तपास सध्या सुरु आहे.

संबंधित घटना मंगळवार, दि. ९ एप्रिल रोजी रात्री उशिरा मिनाक्षी नगर परिसरात घडली. काशीगाव पोलीस ठाण्याच्या पोलीस हवालदारांना यासंबंधी सतर्क करण्यात आले होते. पोलीस घटनास्थळी पोहोचताच कुरेशी याला पोलिसांनी ताब्यात घेतले, तर दोघांनी तेथून पळ काढला. पोलिसांनी घटनास्थळावरून एक मोठे चाकूसारखे शस्त्र, एक दोरी आणि गुरांची कातडी जप्त केली आहे.

हे वाचलंत का? : गुढीपाडवा साजरा केला म्हणून 'झहीर खान'ला कट्टरपंथीयांकडून शिवीगाळ

सदर घटने प्रकरणी आरोपींविरोधात भारतीय दंड संहिता, १८६० नुसार कलम ४२९ आणि कलम ३२ व महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा, १९७६ नुसार कलम ५सी, ९ए आणि ९बी तर क्रुरता प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३ आणि कलम ११ अंतर्गत एफआयआर नोंदविण्यात आला आहे.