मुंबई: एडलवाईस अल्टरनेटिव्हस कंपनीने बुधवारी एल अँड टी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट प्रोजेक्ट कंपनीचे अधिग्रहण केल्याचे घोषित केले. ६००० कोटींवर हे एल अँड टी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे अधिग्रहण करण्यात आले आहे. ही कंपनी इन्फ्रास्ट्रक्चर व उर्जेची वाहतूक करणारी कंपनी आहे. कंपनीच्या मालकीत आधी एल अँड टी व कॅनडा पेन्शन प्लान इव्हेसमेंट बोर्ड यांच्या मालकीची होती.
विशेषतः एल अँड टी कंपनीकडे यातील ५१ टक्के भागभांडवल होते. तर राहिलेले समभाग कॅनडा पेन्शन प्लान इव्हेसमेंट बोर्ड कंपनीच्या अंतर्गत होते. यामध्ये एडलवाईस कंपनीने या आधीच्या कंपनीचा संपूर्ण १०० टक्के हिस्सा विकत घेतला आहे. कंपनीने आपल्या जाहीरनाम्यात म्हटल्याप्रमाणे ४४०० किलोमीटरचा रस्ता व ९६० किलोमीटरची पॉवर ट्रान्समिशन लाईन कंपनीच्या पोर्टफोलिओ अंतर्गत येणार आहे.
या अधिग्रहणानंतर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा पोर्टफोलिओ मालकीत २६ टक्क्यांपर्यंत वाढ होणार आहे. यामध्ये ५००० किलोमीटरचा रस्ता व १८०० स्क्वेअर किलोमीटरचा रस्ता व ८१३ मेगापॉवर पुनर्जीवित उर्जा, व वार्षिक महसूल कमाई ३००० कोटी रुपयांचा समावेश असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
या विक्रीसंबंधित असे सांगण्यात आले आहे की एल अँड टी कंपनीला मुख्य प्रवाहातील नसलेल्या व्यवसायातून बाहेर पडायचे होते.हा एक रणनीतीचा भाग म्हणून आम्ही कंपनीचे अधिग्रहण करू देण्याचा निर्णय घेतला असे म्हटले आहे
नवीनतम संपादनावर भाष्य करताना, एडलवाईस अल्टरनेटिव्हज येथील इन्फ्रास्ट्रक्चर यिल्ड स्ट्रॅटेजीचे व्यवस्थापकीय संचालक श्रीकुमार चत्र म्हणाले की, मालमत्तेमध्ये महसूल आणि ऑपरेशन्सचा एक सिद्ध ट्रॅक रेकॉर्ड आहे, जे भौगोलिकदृष्ट्या विखुरलेले आहेत आणि दीर्घायुष्यी आहेत.