"ज्यांनी मला माझ्या आईच्या अंत्यसंस्काराला जाऊ दिले नाही तेच लोक आम्हाला हुकूमशहा म्हणत आहेत."

    11-Apr-2024
Total Views |
 rajnath singh 
 
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी मोदी सरकारला तानाशाह म्हणणाऱ्यांना उत्तर दिले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या एका मुलाखतीत ते बोलत होते. ज्यांनी मला माझ्या आईच्या अंत्यसंस्काराला जाऊ दिले नाही तेच लोक आम्हाला हुकूमशहा म्हणत आहेत. असं मत यावेळी त्यांनी व्यक्त केलं आहे.
 
राजनाथ सिंह यांच्या आईचे ब्रेन हॅमरेजमुळे निधन झाले. त्यावेळी देशात काँग्रेस सरकारने आणिबाणी घोषित करुन अनेक विरोधी नेत्यांना तुरुंगात टाकले होते. त्यामध्ये राजनाथ सिंह सुद्धा होते. याच कालावधीमध्ये राजनाथ सिंह यांच्या आईचे ब्रेन हॅमरेजमुळे निधन झाले. परंतु अंत्यसंस्कारासाठी राजनाथ सिंह यांना पॅरोल देण्यात आला नाही. आणीबाणी कशी जीवघेणी आहे, याविषयी लोकांमध्ये जनजागृती करत असल्यामुळे त्यावेळी त्यांना तुरुंगात टाकण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
 
२७ दिवस रुग्णालयात उपचार घेत असणाऱ्या माझ्या आईचा हॅमरेजमुळे मृत्यु झाला होता. ते म्हणाले ज्या काँग्रेसने मला माझ्या आईच्या अंत्यसंस्कारासाठी जाऊ दिले नाही ते आता आम्हाला तानाशाह म्हणत आहेत. आज तेच लोक आमच्यावर हुकूमशाहीचा आरोप करत आहेत. इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने देशात आणीबाणी लादून नागरिकांचे हक्क उघडपणे दडपले होते, असंही ते यावेळी म्हणाले.
 
राजनाथ सिंह म्हणाले, जोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींची क्षमता आहे तोपर्यंत ते सरकारचे नेतृत्व करतील “तुम्ही काळजी का करता? मोदीजी कुठेही जात नाहीत. चौथ्या टर्ममध्येही ते नेतृत्व करतील.” चीनच्या मुद्द्यावर ते म्हणाले की, नरेंद्र मोदी पंतप्रधान असताना देशातील एक इंचही जमीन कोणीही काबीज करू शकत नाही.
 
पाकव्यप्त काश्मिरवर बोलताना ते म्हणाले. "पिओके आपले होते, आपले आहे आणि आफलेच राहील. पाकीस्तानने दहशतवादाच्या आडुन भारताला अस्थिर करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे परीणाम त्यांना भोगावे लागतिल. ते दहशतवाद्यांशी लढण्यास सक्षम नसतिल तर आम्ही त्यांना मदत करु."