मुंबई: जागतिक पातळीवर अस्थिरमुळे आज क्रूड तेल व सोने निर्देशांकात वाढ झाली आहे. मध्य पूर्वेकडील दबाव, युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदराबाबत प्रतिक्षा यामुळे सोन्याच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील किंमतीत वाढ झाली आहे. गोल्ड स्पॉट दरात ०.५० टक्क्यांनी १० एप्रिलच्या संध्याकाळपर्यंत वाढ झाली आहे. गोल्ड फ्युचर निर्देशांक ७०५६ रूपयांवर पोहोचला आहे.
देशातील सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली असुन देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. ग्रो या संकेतस्थळावर असलेल्या उल्लेखानुसार चेन्नईत ७५९७५.३०, दिल्लीत ७८१२०.२०, बंगळूरूत ७५९७५.५०, कलकत्तामध्ये ७५९७५.३०,हैद्राबाद येथे ७५९७५.३०, पुण्यात ७३६९३.४० रूपये प्रति १० ग्रॅम किंमत पोहोचली आहे.देशात सरासरी सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम (एक तोळा) ८७१२०.२० रूपयांच्या नव्या उच्चांकावर पोहोचले आहेत.
एमसीएक्सवर सोन्याचे दर ७१४०० रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत पोहोचले आहेत. 'गुड रिटर्न्स' या संकेतस्थळावरील माहितीनुसार मुंबईतील २२ कॅरेट सोन्याचे प्रति १० ग्रॅम दर ३५० रूपयांनी वाढत ६६१०० रुपयांवर पोहोचले आहेत. तर २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅमवर ३८० रूपयांनी वाढ होत ७२११० रूपयांवर पोहोचले आहे. १८ कॅरेट सोन्याच्या दर प्रति १० ग्रॅम २८० रुपयांनी वाढत ५४०८० रुपयांवर पोहोचले आहेत.
सोन्याच्या वाढलेल्या भावावर प्रतिक्रिया देताना एलकेपी सिक्युरिटीजचे व्हीपी रिसर्च एनालिस्ट जतीन त्रिवेदी म्हणाले,'सोन्याचे भाव ७१७०० पर्यंत वाढले परंतु सकाळच्या सत्रात ७१७५० च्या मागील शिखराला ओलांडू शकले नाहीत. बाजार US CPI डेटाची वाट पाहत आहे, त्याच्या प्रकाशनानंतर सोन्याच्या किमतींमध्ये अपेक्षित अस्थिरता. मागील विरूद्ध ३.४% वर अपेक्षित डेटा ३.२% मुळे सोन्याच्या लांब पोझिशन्सवर नफा बुकिंग होऊ शकते. सोने मोठ्या प्रमाणावर चढ-उतारात असताना, प्रॉफिट बुकींगमुळे सुधारणा होण्याची शक्यता आहे कारण सध्याची पातळी अल्पावधीत जास्त खरेदी झालेली दिसते. याव्यतिरिक्त, FOMCX मीटिंग मिनिटे नंतर संध्याकाळी सोन्याच्या किमतींसाठी महत्त्वपूर्ण आहे.'
चांदीही महाग -
एमसीएक्सवर चांदीच्या निर्देशांकात ०.३४ टक्क्यांनी वाढ होते तर चांदी निर्देशांक ८२७३० रुपयांवर पोहोचला आहे. मुंबईतील चांदीच्या दरात १ किलोमागे १००० रूपयांनी वाढले आहेत. मुंबईत एक किलोच चांदीची किंमत ८५५०० रूपयांवर पोहोचली आहे.