२ हजार कोटींच्या ड्रॅग्ज रॅकेटचा मुख्य सूत्रधार जाफर सादिकला अटक; 'या' नेत्यासोबत फोटो व्हायरल!
09-Mar-2024
Total Views |
नवी दिल्ली : नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने नुकतेच उघडकीस आलेल्या २ हजार कोटींच्या ड्रॅग्ज रॅकेटचा मुख्य सूत्रधार जाफर सादिक याला अटक केली आहे. डीएमकेचे माजी पदाधिकारी जाफर गेल्या १५ दिवसांपासून फरार होते. राजस्थानमधील जयपूर येथील हॉटेलमधून त्याला अटक करण्यात आली आहे.फेब्रुवारी २०२४ मध्ये दिल्ली पोलीस आणि एनसीबीने एका मोठ्या ड्रॅग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला होता आणि दिल्लीतून तीन जणांना अटक केली होती. या संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार जाफर सादिक हा तामिळनाडूचा रहिवासी असून तो सत्ताधारी द्रमुक पक्षाचा अधिकारी असल्याचे उघड झाले आहे. सादिक हा चित्रपट निर्माताही आहे. सादिक यांचे तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन आणि त्यांचा मुलगा उदयनिधी यांच्यासोबतचे फोटोही समोर आले आहेत. हा खुलासा झाल्यापासून सादिक फरार होता. एजन्सी त्याचा शोध घेत होत्या. आता त्याला अटक करण्यात आली आहे.
NCB has apprehended Jaffer Sadiq, the kingpin in the India-Australia-New Zealand Drug trafficking network being investigated by us: Narcotics Control Bureau (NCB)
दिल्लीत टाकलेल्या या छाप्यात स्यूडोफेड्रिन नावाचे औषध जप्त करण्यात आले. हे रॅकेट वेगवेगळ्या खाद्यपदार्थांमध्ये हे औषध लपवून ते ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये पाठवत होते, जिथे त्याची किंमत करोडोंची आहे, अशी माहिती समोर आली आहे. हे औषध समुद्रमार्गे पाठवले जात होते.गेल्या तीन वर्षांत ३५०० किलोहून अधिक औषधे या देशांमध्ये पाठवण्यात आल्याचेही समोर आले आहे. आतापर्यंत या देशांमध्ये ४५ वेळा औषधे पाठवण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत किमान ₹२००० कोटी असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान जाफर सादिक हा तमिळ चित्रपट निर्माता आहे. त्यांनी आतापर्यंत ४-५ चित्रपट केले आहेत. त्यांनी ‘मंगई’ हा चित्रपट बनवला होता. त्यातील एक गाणे उदयनिधी यांच्या पत्नीने लाँच केले होते. यापूर्वी त्यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचीही भेट घेतली होती. दि.१७ डिसेंबर २०२३ रोजी त्यांनी सीएम स्टॅलिन यांची भेट घेतली. यावेळी सादिकने त्यांना १० लाखांचा धनादेश दिला. हा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी होता. टायफून मिचॉन्गनंतर त्यांनी ही देणगी दिली.
त्यांनी केवळ सीएम स्टॅलिनच नाही तर त्यांचा मुलगा आणि तामिळनाडू सरकारचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांचीही भेट घेतली. त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २ लाख रुपयांचा धनादेश त्यांना सुपूर्द केला होता. या देणगीबाबत उदयनिधी यांनी सादिक यांच्या स्तुतीसाठी एक पोस्टही लिहिली होती, जी आता हटवण्यात आली आहे.जाफर सादिक हे तामिळनाडूतील सत्ताधारी पक्ष डीएमकेशी संबंधित होते आणि एनआरआय शाखेचे व्यवस्थापक होते. अंमली पदार्थांच्या आरोपानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती.त्याचे अनेक द्रमुक खासदार आणि आमदारांसोबत फोटो आहेत.