मुकेश व नीता अंबानी यांनी अनंतच्या ‘गॉडफादर’ बद्दल यांचा खुलासा

    08-Mar-2024
Total Views | 41
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्री-वेडिंग सोहळा नुकताच गुजरातमधील जामनगरमध्ये संपन्न झाला.
 

anant and radhika 
 
मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या मुलाचा अनंत आणि राधिका (Anant Ambani Radhika Merchant) यांच्या प्री-वेडिंगचा भव्य सोहळा १ मार्च ते ३ मार्च दरम्यान जामनगरमध्ये संपन्न झाला. जगभरात या सोहळ्याची चर्चा सुरू असतानाच अनंत अंबानी यांच्या गॉडफादर बद्दल मुकेश अंबानी (Anant Ambani Radhika Merchant) यांनी केलेले वक्तव्य सध्या लक्ष वेधून घेत आहे.
 
आपल्या मुलाच्या या प्री-वेडिंग सोहळ्यात मुकेश आणि नीता अंबानी यांनी आमंत्रित सर्व पाहुण्यांचे आदरातिथ्य उत्तमरीत्या केले. आता याच सोहळ्यातील एक व्हिडीओ व्हायरल होत असून यात मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान हा आपल्या मुलाचा म्हणजेच अनंत अंबानीचा गॉडफादर आहे असल्याचे म्हटले आहे. त्यावेळी शाहरुखला अनंत अंबानीचा ‘गॉडफादर’ असं म्हणत स्टेजवर बोलवण्यात आले होते.
 
 
 
दरम्यान, हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनंत लहान असल्यापासूनच शाहरुख खान हा त्याचा गॉडफादर होता असे मुकेश आणि नीता अंबानी यांनी म्हटले. अनंत आणि राधिकाला जामनगरमध्ये आर्शिवाद देण्यासाठी संपुर्ण चंदेरी दुनिया अवतरली होती. दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत ते बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांनी देखील या सोहळ्याला आवर्जून हजेरी लावली होती.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121