मुंबई: आज टोरंट (Torrent) कंपनीने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळ ( MSEDCL) कडून ' लेटर ऑफ अवार्ड ' मिळाल्याचे घोषित करून आपण प्रकल्प निविदा जिंकण्याचे सांगितले आहे. आता टोरंट कंपनीकडून नाशिक येथे १५४० कोटी रुपयांचा ३०६ मेगावॉट क्षमतेचा सौर उर्जा प्रकल्प निर्मिती होणार आहे.
एमएसइबी (MSEB) सोलार ऍग्रो पॉवर लिमिटेड (एमएसएपीएल) कडून एमएसकेवीवाय २.० योजनेअंतर्गत 'सी' कंपोनंट (Component) चे पंतप्रधान सौर उर्जा प्रकल्प योजनेसाठी केला जावा असे कंपनीच्यावतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले गेले आहे. १८ महिन्याच्या कालावधीत हा प्रकल्प पूर्ण होण्याची अपेक्षा केली जात आहे.
टेरिफ(Tariff) प्रति किलो मेगावॉटमागे तीन रूपये १० पैसे इतके निश्चित केले गेले आहेत.सौर उर्जा प्रकल्पाचे विकेंद्रीकरण करत शेती उत्पादन ग्राहकांसाठी विना अडथळा पुरवठा व्हावा यासाठी या प्रकल्पाचे मुख्य प्रयोजन असणार आहे. असे झाल्यास स्वाभाविकपणे शेतीला या प्रकल्पाचा निश्चित फायदा होऊ शकतो. या प्रकल्पाची कागदपत्रे अंमलबजावणी एमएसएपीएल (MSAPL) वतीने करण्यात येणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या ऊर्जा निर्मिती क्षमेतेत ३ मेगावॉट पर्यंत वाढ होऊ शकते.