मुंबई: रोगनिदानविषयक चाचण्या आणि सामग्रीच्या (आयव्हीडी) निर्मितीतील लॉर्ड्स मार्क इंडस्ट्रीज लिमिटेडने भारत सरकारच्या उन्नत भारत अभियान या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या सहकार्याने, आयआयटी दिल्लीच्या 'फाऊंडेशन फॉर इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी ट्रान्सफर'च्या (एफआयटीटी) पुढाकाराने, ग्रामीण भारतातील आरोग्य सेवा सुकरतेत क्रांती घडवून आणण्याच्या उद्देशाने महत्त्वपूर्ण ठरलेल्या ई स्मार्ट क्लिनिक प्रकल्पाच्या अंमलबजावणीला प्रत्यक्षात सुरुवात केली आहे. एम्स राजकोट येथे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.
आयआयटी दिल्ली येथे लॉर्ड्स मार्क इंडस्ट्रीज आणि उन्नत भारत अभियान यांच्यात स्वाक्षरी केलेल्या अनन्य सामंजस्य करारातून हा उपक्रम २२ फेब्रुवारी २०२४ रोजी सुरू झाला.
या प्रसंगी टिप्पणी करताना, लॉर्ड्स मार्क इंडस्ट्रीज लिमिटेडचे कार्यकारी संचालक मानव तेली म्हणाले, "उन्नत भारत अभियानासोबत आमचे सहकार्य आणि प्रयत्नांना मूर्तरूप मिळाल्याचे पाहून मला खूप आनंद होत आहे. हा उपक्रम म्हणजे आरोग्यसेवेतील नावीन्य आणि सुलभतेसाठी, ग्रामीण भारतातील व्यक्तींना अत्याधुनिक निदान आणि तज्ज्ञ वैद्यकीय सल्लामसलत अभूतपूर्व परवडण्याजोग्या दरात मिळवून देण्याच्या आमच्या बांधिलकीला अधोरेखित करतो. आमचा विश्वास आहे की, आरोग्यसेवेच्या सर्व नागरिकांना सर्वसमावेशक आणि समान संधींचे आमचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.''
लॉर्ड्स मार्क इंडस्ट्रीजने त्यांच्या तंत्रज्ञान भागीदार डोझीच्या सहकार्याने विकसित केलेले ई स्मार्ट क्लिनिक, कोणत्याही बाह्य संलग्नकांशिवाय रुग्णाच्या तब्येतीविषयक महत्त्वाची परिमाणे शोधण्यासाठी पेटंटप्राप्त तंत्रज्ञानाचा वापर करते. केवळ २० मिनिटांत रक्त तपासणी करण्यास सक्षम, क्लिनिक अखंडपणे ग्रामीण रुग्णांना नामांकित डॉक्टरांशी ऑनलाइन सल्लामसलतीसाठी दुवा जोडून देते, रुग्णांना त्यांच्या स्थानिक भाषेत संवाद साधता येतो.लॉर्ड्स मार्क इंडस्ट्रीजने बायोकेमिस्ट्री आणि हेल्थ किऑस्कसाठी पेटंट दाखल केले आहे, ज्याची अचूकता ९९ टक्के इतकी आहे. परवडणाऱ्या वैद्यकीय पायाभूत सुविधांच्या माननीय पंतप्रधानांकडून संकल्पित दृष्टिकोनाशी जुळवून घेणाऱ्या या उच्च-स्तरीय डॉक्टरांशी अखंड ऑनलाइन संवादासह, रोग शोधण्यासाठी अपवादात्मकपणे कमी खर्चात रुग्णांना असा सुलभ व सोयीस्कर उपाय प्रदान केला जाण्याचे हे जागतिक स्तरावरील पहिलेच उदाहरण आहे.
आयआयटी दिल्लीच्या फाऊंडेशन फॉर इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी ट्रान्सफरचे राष्ट्रीय समन्वयक विजेंद्र कुमार विजय यांनी या भागीदारीबद्दल आशावाद व्यक्त केला की, "लॉर्ड्स मार्क इंडस्ट्रीज लिमिटेड, उन्नत भारत अभियान आणि एफआयआयटी यांच्यातील सहकार्याने या क्षेत्रात महत्त्वपूर्ण झेप घेतली गेली आहे. आरोग्यसेवांचे सार्वत्रिकीकरण आणि लोकशाहीकरण करण्याचे सामूहिक मिशन. तंत्रज्ञान आणि नवकल्पना वापरून, आम्ही लाखो लोकांच्या जीवनात मूर्त बदल घडवून आणण्यासाठी सज्जता केली आहे. मला नजीकच्या भविष्यात भारताच्या वैद्यकीय पायाभूत सुविधांवर परिवर्तनीय प्रभावाची अपेक्षा आहे."
पाच प्रारंभिक केंद्रांवर यशस्वी चाचण्यांनंतर, ई स्मार्ट क्लिनिकचे संपूर्ण भारतात कार्यान्वयन केले जाईल. काही आंतरराष्ट्रीय भागीदारांनी जागतिक स्तरावर वितरणासाठी देखील स्वारस्य व्यक्त केले आहे. प्रति रुग्ण १,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत चाचणी आणि सल्लामसलत करून देणारी ही क्लिनिक देशभरात उपलब्ध करून देणे हे देशाच्या सेवेसाठी वचनबद्ध असलेल्या लॉर्ड्स मार्क इंडस्ट्रीजचे उद्दिष्ट आहे.
भारतातील ई स्मार्ट क्लिनिकची बाजारपेठ ३,००० कोटींहून अधिक आहे, लॉर्ड्स मार्क इंडस्ट्रीजसाठी विविध उपचारात्मक चाचण्यांसाठी उपभोग्य वस्तूंचा पुरवठा करण्याच्या अतिरिक्त संधी उपलब्ध आहेत. देशभरातील १६ हजारांहून अधिक गावांमध्ये उपस्थिती असलेले उन्नत भारत अभियान हे ई स्मार्ट क्लिनिक प्रकल्पाचा प्रचार आणि अंमलबजावणी करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.
ई स्मार्ट क्लिनिक प्रकल्पाचा शुभारंभ हा सर्व नागरिकांसाठी सुलभ आणि परवडणाऱ्या आरोग्यसेवेच्या शोधातील एक महत्त्वाचा टप्पा आहे, जो सरकारच्या आरोग्यदायी, अधिक समृद्ध भारताच्या व्यापक दृष्टीकोनाशी सुसंगत आहे.