UCO Bank Latest मुंबई: सीबीआयने (CBI) ने राजस्थान व महाराष्ट्रातील ६७ ठिकाणी युको बँकेच्या (UCO Bank) तक्रारीनंतर बँकेच्या खात्यांवर धाड टाकली आहे. आयएमपीएस (Immediate Payment Services) मधील संशयास्पद खाते व्यवहारासाठी ही चौकशी सुरू करण्यात आल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. ८२० कोटींच्या हेराफेरी प्रकरणी ही कारवाई युको बँकेच्या काही संशयास्पद खात्यांवर चालू केली आहे.
नोव्हेंबर २०२३ मध्ये युको बँकेने सीबीआयकडे गैरव्यवहार प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. सीबीआयला युको बँकेने कळवलेल्यानुसार १० व ११ नोव्हेंबरला आयएमपीएस इनवर्ड (Inward) व्यवहारात काही खाजगी बँकेतील व्यवहार नोंदणी युको बँक ग्राहकांच्या खात्यात नोंदविलेली आढळली होती. त्यामुळे दुसऱ्या बँकेतील खात्यातील पैसे डेबिट (Debit) न होता युको बँकेच्या ग्राहक खात्यात मात्र पैसे क्रेडिट (Credit) झाल्याचे निदर्शनास आले होते.
आयडीएफसी बँक,सर्वोदय स्मॉल फायनान्स बँक,उत्कर्ष स्मॉल फायनान्स व फिनकेअर स्मॉल फायनान्स या बँकेतील संबंधित रक्कम डेबिट न झाल्याने या परिस्थीतीचा लाभ घेत आपला निधी विविध मार्गाने वळवण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका सीबीआयकडून ठेवण्यात आला.
या पैशातील रक्कम मोठ्या प्रमाणात युको बँकेतून काढली गेली. त्यामुळे बँकेने युको बँकेला माहिती दिल्याप्रमाणे, ८२० कोटी रुपये रकमेतील ६६४ कोटी रुपये युको बँकेने धारणाधिकार (Lien) मार्फत परत मिळवले आहेत व बाकीची रक्कम प्रतिक्षेत असल्याचे बँकेने सीबीआयला सूचित केले आहे. मागील डिसेंबर महिन्यात या संबंधीत व्यक्ती व युको बँकेच्या अधिकारी वर्गाची कलकत्ता, व मंगलोर येथे चौकशी करण्यात आली होती.
“या ऑपरेशन्स दरम्यान, युको (UCO) बँक आणि आयडीएफसी (IDFC)शी संबंधित अंदाजे १३० दोषी दस्तऐवज, तसेच ४३ डिजिटल उपकरणे (४० मोबाईल फोन, २ हार्ड डिस्क आणि १ इंटरनेट डोंगलसह) फॉरेन्सिक विश्लेषणासाठी जप्त करण्यात आली. याव्यतिरिक्त, ३० संशयित देखील घटनास्थळी सापडले आणि त्यांची तपासणी केली, असे ”सीबीआयच्या प्रवक्त्याने प्रसारमाध्यमांना सांगितले आहे.