टेलिकॉम ग्राहकांसाठी मोठी बातमी बाजारात 'पोस्टपेड पर्व येणार'

प्रीपेड कार्डवर भर न देता टेलिकॉम कंपन्या पोस्टपेडचे नवे टेरिफ प्लॅन आणणार

    07-Mar-2024
Total Views | 353

Telecom
 
 
मुंबई: (Postpaid News updates) 'इकॉनॉमिक टाईम्स'ने नुकत्याच दिलेल्या बातमीनुसार टेलिकॉम ग्राहकांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. टेलिकॉम जायंट कंपन्यांनी आपल्या 'टेरिफ प्लॅन'मध्ये वाढ करायचे ठरवलेले आहे. एकत्रित डेटा,ओटीटी,कॉलिंग अशा एकत्रितपणे आकर्षक सुविधा पुरवत पोस्टपेड ( Postpaid ) योजना खरेदी करण्यासाठी टेलिकॉम कंपन्या भर देणार आहेत. अधूनमधून दरवाढ करता ऐवजी ग्राहकांना पोस्टपेड सुविधा पुरविण्यासाठी कंपन्यांचा कल आहे. कंपन्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी हे कंपन्यांचे नव प्रयोजन आहे.
 
कंपन्यांचे की परफॉर्मन्स मेट्रिक (केपीआय) सुधारण्यासाठी कंपनीने हे नवे पाऊल उचलले आहे. वाढलेल्या भरीव स्पर्धेत डेटा टेरिफमध्ये सतत किरकोळ वाढ परवडणार हे कंपन्यांना कळून चुकले आहे. यासाठी पर्याय म्हणून कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे. बातमीनुसार प्रीपेडची प्रसिद्धी पत्रके कंपन्यांनी आपल्या सेंटरमधून काढत पोस्टपेड (Postpaid) प्लॅन विक्रीसाठी विशेष प्रयत्न करायला सांगितले आहे.
 
 
त्यामुळे येणाऱ्या काळात पोस्टपेड प्लॅनचे काय दरात ठरणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. विशेषतः प्राथमिक सुविधाबरोबर ओटीटी प्लॅटफॉर्म व इतर विशेष कंटेट सुविधा ग्राहकांना पुरवण्यासाठी जिओ, भारती एअरटेल, वीआय या कंपन्या प्रयत्न करणार आहेत. यामध्ये फॅमिली प्लॅनसारखे पर्याय उपलब्ध होत 'पे पर युज' या मॉडेलवर कंपन्या दर आकारणी करतील असा प्राथमिक अंदाज आहे. ५जी स्पेक्ट्रम आल्यानंतर टेलिकॉम बाजारातील परिस्थिती बदलली आहे. बदलत्या परिस्थितीत महसूल वाढ होत कंपन्या तग धरण्यासाठी हे पाऊल उचलणार असल्याचे समजते.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121