'आर्टिकल ३७०' चित्रपट लवकरच जगभरात १०० कोटींच्या क्लबमध्ये करणार एन्ट्री

    06-Mar-2024
Total Views | 47
आदित्य धर निर्मित आणि आदित्य जांभळे दिग्दर्शित 'आर्टिकल ३७०' चित्रपट करणार १०० कोटी क्लबमध्ये प्रवेश 
 

article 370 
 
मुंबई : जम्मू- काश्मिरमधून हटवण्यात आलेल्या कलम ३७० (Article 370) चा स्वातंत्र्यानंतरचा ७५ वर्षांचा इतिहास 'आर्टिकल ३७०' (Article 370) या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. दिग्दर्शक आदित्य जांभळे यांनी अडीच तासात संपुर्ण इतिहास उत्कृष्ट मांडला असल्यामुळे त्यांचे विशेष कौतुक. २३ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या (Article 370) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली असून लवकरच हा चित्रपट १०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करणार आहे.
 
हे वाचलंत का? - ‘आर्टिकल ३७०’चा ७५ वर्षांचा इतिहास!  
 
'आर्टिकल ३७०' या चित्रपटाने आत्तापर्यंत देशात ५६.१४ कोटी आणि जगभरात ७७.०७ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी या चित्रपटाने ६.१२ कोटी, दुसऱ्या दिवशी ९.८ कोटी, तिसऱ्या दिवशी १०.२५ कोटी कमावले होते. त्यानंतर चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या दिवसाची एकूण कमाई पकडून या चित्रपटाने ४४.६० कोटींची कमाई करत यश मिळवले होते.
 

article 370 post 
 
आदित्य जांभळे दिग्दर्शित ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटाची निर्मिती आदित्य धर आणि ज्योती देशपांडे यांनी मिळून केली आहे. तर चित्रपटात मुख्य भूमिकेत यामी गौतमसोबत, अभिनेत्री प्रियामणी, वैभव तत्ववादी, अरुण गोविल, किरण करमरकर दिसत आहेत.
 
हे वाचलंत का? - धक्कादायक! ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटाला आखाती देशांमध्ये बंदी  
 
दरम्यान, या चित्रपटात यामीसोबत झळकणाऱ्या वैभव तत्ववादी याने आपल्या भावना व्यक्त करत म्हटले होते की, “आदित्य जांभळे दिग्दर्शित या विलक्षण चित्रपटाचा भाग होण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. अप्रतिम कलाकारांसोबत काम केल्याने ते आणखी खास बनते. काश्मीरच्या नयनरम्य ठिकाणी शूटिंग करणे ही एक उत्तम गोष्ट होती. चित्रपटाच्या शूटिंगवेळी आम्ही सर्वांनी खूप मेहनत केली पण चित्रपट पाहिल्यानंतर मला वाटते की सर्व मेहनत सार्थकी लागली".
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121