३ वर्षाच्या मुलीवर बलात्कार मग हत्या, आरोपीला न्यायालयाची कठोर शिक्षा!

    06-Mar-2024
Total Views |
Rape-Murder Of 3-Yr-Old Girl

नवी दिल्ली : अलाहाबाद उच्च न्यायलयाने अनैसर्गिक कृत्य केल्यानंतर ३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीला कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली आहे. दिनेश पासवान असे शिक्षा झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. आरोपीच्या गुन्हेगारी इतिहासाच्या अनुपस्थितीवर न्यायालयाने आपला निर्णय दिला. उच्च न्यायालयानेही दिनेश पासवान यांच्यात अजूनही सुधारणेला वाव असल्याचे मान्य केले आहे. दि. २१ फेब्रुवारी २०२४ रोजी हा निर्णय सुनावण्यात आला आहे.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातील खागा पोलीस स्टेशन परिसरात घडली. येथे दि.१५ ऑक्टोबर २०२१ रोजी मुलीच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर तक्रारदार वडिलांनी २५ वर्षीय आरोपी दिनेश पासवान हा त्यांचा शेजारी असल्याचे सांगितले होते. त्याने त्यांच्या ३ वर्षांच्या मुलीला सफरचंदाचे आमिष दाखवून आपल्या खोलीत नेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पहिल्याच प्रयत्नात अपयश आल्यानंतर आरोपीने रात्री १२ वाजता मुलगी एकटी असल्याचे पाहून तिला आपल्या खोलीत आणले. येथे त्याने मुलीवर बलात्कार करून अनैसर्गिक कृत्य केले.

नंतर आपले नाव उघड होईल या भीतीने दिनेश पासवान याने मुलीची हत्या करून मृतदेह लपवून ठेवला. दि.१५ ऑक्टोबरच्या रात्रीच आरोपीला अटक करण्यात आली होती. आयपीसी आणि पॉक्सो कायद्याच्या कलम ३६४, ३७६ AB, ३७७, ३०२ आणि २०१ अंतर्गत हे प्रकरण न्यायालयात चालवले गेले. दि.१८ जानेवारी २०२२ रोजी या प्रकरणाच्या सुनावणीनंतर, फतेहपूरच्या POCSO प्रकरणांच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी आरोपी दिनेश पासवानला दोषी ठरवले आणि त्याला फाशीची शिक्षा सुनावली.

आपल्या शिक्षेविरोधात दिनेश पासवान यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात अपील केले होते. दिनेशच्या वतीने वकील तनिषा जहांगीर मुनीर आणि प्रदीप कुमार यांनी युक्तिवाद केला. न्यायमूर्ती अश्वनी कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती सय्यद आफताब हुसैन रिझवी यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. बचाव पक्षाने दिनेश पासवानला निर्दोष घोषित केले आणि पोलिस तपासातील सर्व त्रुटींची यादी केली. मात्र, फिर्यादी पक्षाने दिनेशला दिलेली फाशीची शिक्षा योग्य ठरवली. शेवटी दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने दिनेश पासवानचा गुन्हा गंभीर मानला.

असे असूनही, न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, आरोपी दिनेश पासवान विवाहित असून एका मुलाचा पिता आहे. यासोबतच दिनेशची गुन्हेगारी पार्श्वभूमी ही आहे. आरोपी दिनेशमध्ये भविष्यात सुधारणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही, हे न्यायालयाने मान्य केले. अखेर उच्च न्यायालयाने दिनेशला सुनावलेली फाशीची शिक्षा ३० वर्षांच्या तुरुंगवासात बदलली.