जाणून घ्या! MMRDAचे राज्यातील महत्त्वाकांशी प्रकल्प कोणते?

एमएमआरडीएचा ४६,९२१ कोटींचा अर्थसंकल्प सादर

    06-Mar-2024
Total Views | 34
MMRDA Budget Projects


मुंबई (विशेष प्रतिनिधी) :
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा(MMRDA)चा सन २०२४-२५वर्षाचा ४६,९२१.२९ कोटींचा मूळ अर्थसंकल्प मंगळावर दि. ५ रोजी सादर झाला. या अर्थसंकल्पात मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्थेच्या बळकटीकरणावर भर आहे. मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांना अधिकाधिक आणि जागतिक दर्जाच्या सेवा सुविधा उभारण्यासाठी सदर अर्थसंकल्पात ४१,९५५.३४ कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे.

सन २०२४-२५ साठी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात प्रामुख्याने मुंबई महानगर प्रदेशातील सार्वजनिक वाहतूक व पायाभूत सुविधांचा विकास करण्याच्या दृष्टीने विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांवर भर देण्यात येणार आहे. त्यानुसार सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पातील ४१,९५५.३४ कोटी इतका खर्च हा केवळ पायाभूत सुविधा प्रकल्पांवर करण्यात येणार आहे. मुंबई ते नवी मुंबई दरम्यानचे अंतर आणि प्रवासाचा कालावधी याला मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. १२ जानेवारी रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते अटल सेतू या भारतातील सर्वात लांब सागरी सेतूचे उद्घाटन करण्यात आले आणि तो १३ जानेवारी पासून सार्वजनिक वापरासाठी खुला करण्यात आला. याच कनेक्टिव्हिटीला अधिक उंचीवर नेण्यासोबतच आणि शाश्वततेला चालना देण्याबरोबरच टोल वसुलीद्वारे एमएमआरडीएच्या महसुलातही वाढ होईल, असा अंदाज एमएमआरडीएने व्यक्त केला आहे.

राज्य सरकारने एमएमआरच्या विकासाकरीता सकारात्मक विचार करून प्राधिकरणास अनेक प्रकल्प राबविण्याकरीता सहाय्य केले आहे. प्रकल्पांचा अवाका पाहता प्राधिकरणाचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यकतेनुसार ६०००० कोटी पर्यंतचे कर्ज उभारण्यास शासनाने मंजूरी दिली आहे. तसेच प्राधिकरणाच्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी अतिरिक्त ३०,००० कोटीचे कर्ज उभारणीसाठीचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला आहे. त्यापैकी 'आरईसी' ने मेट्रो प्रकल्पासाठी ३०,५९३ कोटी कर्ज मंजूर केले आहे. यासह विस्तारीत मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्प राबविण्यासाठी भूसंपादनासह २४६०.१२ कोटी रक्कम अंदाजित करण्यात आली आहे. तर मुंबई मेट्रो वन वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मार्ग हस्तांतरण व संपादनासाठी ४७०० कोटी रुपये इतकी तरतूद करण्यात आली आहे.

प्राधिकरणामार्फत उभारण्यात येणाऱ्या कर्जांपैकी पहिल्या टप्प्यात रू.१२,००० कोटीच्या कर्ज रकमेसाठी शासन हमी दिली आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यातील १२००० कोटीच्या शासन हमीचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला आहे. मे. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी ५०,३०१ कोटी इतके कर्ज विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी मंजूर केले आहे. महाराष्ट्र शासनाने मेट्रो व पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी कर्ज उभारण्यास परवानगी दिल्यामुळे मेट्रो व पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण करणे शक्य होणार आहे.


मेट्रो प्रकल्पांसाठी


१) मेट्रो २अ २००.०० कोटी
२) मेट्रो २ब ४३०२.६४ कोटी
३) मेट्रो ४ ४०८३.३६ कोटी
४) मेट्रो ४अ ५३०.२० कोटी
५) मेट्रो ५ २१८६.६८ कोटी
६) मेट्रो ६ १३२५.५७ कोटी
७) मेट्रो ७ १७१.८५ कोटी
८) मेट्रो ९ व ७अ २३५९.९६ कोटी
९) मेट्रो मार्गिका १० १.२० कोटी
१०) मुंबई मेट्रो मार्ग १२ १५१०.५८ कोटी
२३) मुंबई मेट्रो मार्ग १४ १००.०० कोटी
११) मेट्रो भवन ३०० कोटी


रस्ते प्रकल्पांसाठी
 

वर्सोवा-विरार सागरी सेतू १५० कोटी
अटल सेतू ८१७ कोटी
शिवडी ते वरळी उन्नतमार्ग ६०० कोटी
ठाणे ते बोरीवली भुयारी मार्ग ४००० कोटी
बोरीवली-गोराई खाडीपूल (भू-संपादन) ७५ कोटी
मुंबई शहरातील ऑरेंज गेट मार्ग २४००.०० कोटी
नरिमन पॉईंट ते कुलाबा/कफ परेड पूल १००.५४ कोटी
ठाणे कोस्टल रोड ५००.०० कोटी
पूर्व मुक्त मार्गाचे विस्तारीकरण ५००.००कोटी
अटल सेतू ते मुंबई पूणे एक्स्प्रेस वे जोडरस्ता ५००.०० कोटी
ठाणे तीन हात नाका जंक्शनची सुधारणा १५०.०० कोटी
आनंद नगर ते साकेत उन्नत मार्ग ३००.०० कोटी


स्मारक उभारणीसाठी


स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे राष्ट्रीय स्मारक १७० कोटी.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ६०० कोटी.
एमएमआर क्षेत्राच्या विकासासाठी
नवनगर विकास प्रकल्प १६० कोटी
ग्रोथ सेंटर उभारणी २५० कोटी
रमाबाई आंबेडकनगर एसआरए ६०० कोटी
एमएमआरमधील वाहतूक व्यवस्थापन २३२२ कोटी
पाणीपुरवठा प्रकल्पांसाठी ८८६ कोटी
मेट्रो मार्गिका आणि मेट्रो भवन १७,००० कोटी
शिवडी वरळी जोडरस्ता ६००.०० कोटी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ६००.०० कोटी
ठाणे बोरिवली ट्विन टनेल ४०००.०० कोटी
ऑरेंज गेट टनेल २४००.०० कोटी
पाणीपुरवठा प्रकल्प ८८६.०० कोटी.
ठाणे कोस्टल रोड ५००.०० कोटी
छेडानगर-घाटकोपर ते ठाणेपर्यंत
पूर्व मुक्त मार्गाचे विस्तारीकरण ५००.००कोटी
मुंबई, ठाणे व नवी मुंबई वाहतूक व्यवस्थापन २३२२.०० कोटी


अग्रलेख
जरुर वाचा
सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे १०० पर्यटन स्थळांवर साजरा केला जाणार आंतरराष्ट्रीय योग दिन!

सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे १०० पर्यटन स्थळांवर साजरा केला जाणार आंतरराष्ट्रीय योग दिन!

२१ जून २०२५ रोजी साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. देशभरातील १०० पर्यटन स्थळांवर योग दिन साजरा केला जाणार आहे. त्याचबरोबर ५० महत्वपूर्ण सांस्कृतिक स्थळांवर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जाणार आहे. आयुष मंत्रालयाद्वारे विशाखापट्टनम येथे साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121