अजय देवगणच्या 'मैदान'ला ४ वर्षांनी मुहुर्त गवसलाच, या दिवशी होणार प्रदर्शित
05-Mar-2024
Total Views |
अखेर अजय देवगणची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘मैदान’ चित्रपटाला प्रदर्शनासाठी योग्य दिवस मिळाला.
मुंबई : गेल्या ४ वर्षांपासून प्रदर्शनासाठी रखडलेला बहुचर्चित चित्रपट ‘मैदान’ (Maidan Movie) अखेर या वर्षी म्हणजेच २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. अजय देवगण (Ajay Devgan) याची प्रमुख भूमिका असलेल्या ‘मैदान’ या चित्रपटाची कथा सत्य घटनेवर आधारित असून भारतीय फुटबॉल टीमचे माजी कर्णधार सैय्यद अब्दुल रहीम यांची गोष्ट या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे.
अजय देवगणचा ‘मैदान’ हा चित्रपट याचवर्षी एप्रिल महिन्यात ईदच्या दिवशी प्रदर्शित केला जाणार आहे. दरम्यान, चित्रपटाचे पहिले पोस्टर २०२० मध्ये आले होते. त्यावेळी २०२० मध्ये चित्रपट प्रदर्शित केला जाईल असे ठरले होते. मात्र, काही अपरिहार्य कारणांमुळे तारीख बदलून हा ‘मैदान’ २०२३ च्या जूनमध्ये भेटीला येईल असे सांगण्यात आले होते. परंतु, पुन्हा एकदा ही तारीख बदलून अखेर ४ वर्षांनी या चित्रपटाला प्रदर्शनाचे ‘मैदान’ मोकळे मिळाले असेच म्हणावे लागेल.
'मैदान' या चित्रपटाचे कथानक सत्य घटनेवर आधारित आहे. भारतीय फुटबॉल टीमचे माजी कर्णधार सैय्यद अब्दुल रहीम यांची कहाणी यातून मांडण्यात येणार आहे. अमित शर्मा यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. दरम्यान, या चित्रपटात अजय देवगणसोबत प्रियामणि, गजराज राव आणि रुद्रनील घोष झळकणार आहेत.