“वीर सावरकरांचा बायोपिकसाठी विचार आजवर का केला नाही?”, रणदीपचा उलट प्रश्न...

    04-Mar-2024
Total Views | 139
स्वातंत्र्यवीर सावरकर हा चरित्रपट २२ मार्च रोजी हिंदी आणि मराठी भाषेत प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लॉंच सोहळा अभिनेता, दिग्दर्शक रणदीप हुड्डा याच्या उपस्थितीत संपन्न झाला
 
veer savarkar 
 
मुंबई : भारताला इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी अनेक स्वातंत्र्यसेनानींनी प्राणांची आहुती दिली. त्यापैकी एक अग्रेसर नाव म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. वीर सावरकरांच्या (Swatantryaveer Ssavarkar) जीवनावर आधारित आणि आजवर जे सावरकर आपण वाचले आहेत, त्या पलिकडे स्वातंत्र्यवीर सावरकर काय होते? हे मोठ्या पडद्यावर 'स्वातंत्र्यवीर सावरकर' (Swatantryaveer Ssavarkar)  या चरित्रपटातून पाहता येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. यावेळी संपुर्ण चित्रपटाची टीम उपस्थित होती. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना रणदीप हुड्डा (Randeep Hooda) म्हणाला की, “आजवर महात्मा गांधी, सरदार पटेल यांच्यावर चरित्रपट तयार करण्यात आले आहेत, मग वीर सावरकरांवर का बनू शकत नाही?”, असा उलट प्रश्नच त्याने उपस्थितांना केला.
 
बायोपिकसाठी स्वातंत्र्यवीक सावरकर यांचीच निवड का? असा प्रश्न विचारला असता रणदीप म्हणाला की, “आतापर्यंत मी सरबजीत, राजा रवी वर्मा हे बायोपिक केले होते. त्यामुळे माझ्या मनात प्रश्न आला की, वीर सावरकर का नाही? कारण चित्रपट हे अधिकाधिक लोकांपर्यंत आणि जगभरात फार कमी काळात पोहोचण्यासारखे फार प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे सावरकरांचा इतिहास आणि त्यांच्याबद्दल असणारे बरेचसे गैरसमज दुर व्हावे आणि आजच्या पिढीला सावरकर, त्यांचे विचार, त्यांचे अखंड भारतचे स्वप्न काय होते हे समजावे यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचीच निवड बायोपिकसाठी केली”.
 
दरम्यान, स्वातंत्र्यवीर सावरकर या चरित्रपटात स्वत: रणदीप हुड्डा यानेच सावरकरांची व्यक्तीरेखा साकारली आहे. यासाठी रणदीपने ३३ किलो वजन देखील कमी केले होते. ज्यावेळी सावरकरांना दोनदा जन्मठेप झाली होती, त्याकाळाचे चित्रिकरण करत असताना मला आलेल्या यातना या सावरकरांच्या त्यागापुढे काहीच नव्हत्या अशी कबूली देखील रणदीपने दिली. चित्रपटाबद्दल अधिक बोलायचे झाल्यास, या चित्रपटाचे दिग्दर्शन, लेखन, निर्मिती आणि अभिनय अशा चारही महत्वपुर्ण भूमिका रणदीप हुड्डा याने निभावल्या आहेत. २२ मार्च रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट हिंदीसह मराठी भाषेत देखील प्रदर्शित होणार आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
साहित्याचे समाजात प्रतिबिंब उमटत असते : पद्मश्री नामदेवराव कांबळे

साहित्याचे समाजात प्रतिबिंब उमटत असते : पद्मश्री नामदेवराव कांबळे

समरसता साहित्य संमेलनात विचारवंतांची उपस्थिती; समाजप्रबोधनावर भर "समरसता हा सामाजिक जीवनात जगण्याचा महत्वाचा विषय असून साहित्यात समाजाचे प्रतिबिंब उमटत असते. परिवर्तनासाठी प्रवर्तन आवश्यक आहे,म्हणूनच समाजनिष्ठ साहित्यनिर्मिती ही काळाची गरज आहे. त्यामुळे भारत अधिक सुदृढ व शक्तिशाली राष्ट्र होऊ शकतो," असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त व पद्मश्री नामदेवराव कांबळे यांनी केले. ते श्रीगुरूगोविंदसिंह साहित्यनगरी नांदेड येथील २० व्या समरसता साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी बोलत ..

पुणे शहराची नवीन क्षेत्रात पदार्पण करून सामर्थ्य निर्माण करण्याची क्षमता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे शहराची नवीन क्षेत्रात पदार्पण करून सामर्थ्य निर्माण करण्याची क्षमता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दि. १ ऑगस्ट रोजी 'पुणे मेट्रोपॉलिटन रिजन ग्रोथ हब' चा शुभारंभ यशदा येथे करण्यात आला. या कार्यक्रमात बोलत असताना फडणवीस म्हणाले, कोणत्याही एका शहराने एखाद्या क्षेत्रावर वर्चस्व गाजविण्यासारखी स्थिती आता राहिली नसून महाराष्ट्रातील अनेक शहरे गतीने विकास करत आहेत. मात्र,पुणे शहर प्रचंड प्रगतशील आणि नाविन्यतेचे केंद्र असून नवीन क्षेत्रात पदार्पण करून आपले सामर्थ्य निर्माण करण्याची या शहरात क्षमता आहे. भविष्यात पुणे निश्चितच भरारी घेईल आणि त्यासाठी ग्रोथ हबच्या माध्यम..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121