मुंबई: नोकिया एकेकाळच्या प्रसिद्धीझोतात असलेल्या कंपनीने सरकारी उपक्रमासाठी पुढाकार घेतलेला आहे. बातमीनुसार नोकिया या टेलिकॉम व आयटी तंत्रज्ञान कंपनीने स्टरलाईट टेक्नॉलॉजी लिमिटेड या ऑप्टिकल व डिजिटल सुविधेसाठी भागीदारी करण्याचे ठरवले आहे. सरकारी संस्था व उपक्रमांसाठी या दोन्ही कंपन्यां एकत्र येऊन सरकारी प्रकल्पातील नेटवर्किंग, डिजीटल सोलूशन या सेवा दर्जेदार बनवणार आहेत.
नोकियाने आपल्या जाहीरनाम्यात म्हटल्याप्रमाणे, दोन्ही कंपन्या एकत्र येत सरकारी सेवांचा नेटवर्क व दर्जेदार कनेक्टिव्हिटीसाठी एकत्र आलेलो आहोत. ही भागीदारी औद्योगिक क्षेत्रातील नवीन ४.० क्रांती घडवेल. यामुळे व्यवसाय व तंत्रज्ञान क्षेत्रातील दर्जेदार सेवेमुळे नवीन औद्योगिक परीवर्तन होऊ शकेल. दर्जेदार ५ जी नेटवर्क, इंटरनेट ऑफ थिंग्ज, लो लेंटसी कनेक्शन, सप्लाय चेन, रियल टाइम डेटा एनालिसिस यासाठी वेगवान दर्जेदार इंटरनेट सुविधा उपलब्ध होऊ शकेल.
STL येथे ग्लोबल सर्व्हिसेस बिझनेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण चेरियन म्हणाले, "एसटीएलचा कनेक्टिव्हिटी सोल्यूशन्समधील व्यापक अनुभव, नोकियाच्या 5G आणि IoT मधील तांत्रिक सामर्थ्याने, एंटरप्राइझ कनेक्टिव्हिटी पुन्हा परिभाषित करण्याची आणि उद्योगांमध्ये परिवर्तन करण्याची क्षमता असलेली एक समन्वय निर्माण करते. एकत्रितपणे, आम्ही एंटरप्राइजेसना त्यांच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्यासाठी सक्षम बनविण्याची कल्पना करतो,"