मोहित सोमण
गेले काही वर्षे अर्थकारण पाहता डिजिटल युगात शोधकार्याला नैतिक अधिष्ठान प्राप्त झाले आहे. शोध ही काळाची जननी नसून वाढती गरज ही काळाची गरज बनली आहे. माहिती तंत्रज्ञानाचा आवाका ' लार्जर देन लाईफ ' बनल्यामुळे समजासंस्कृतीतील पाळेमुळे बदलत आहेत. निश्चितच त्याचा फायदा ब्रँड कंपन्यांना झाला नाही तर नवल वाटायला हवे. आता आयपीएल क्रिकेटचा मोसम व जवळच येऊन ठेवलेला लोकसभा निवडणूकीची चाहूल पाहता व्यवसायाचा खरा ' सिजन' सुरू झाला आहे.
एफएमसीजी, घाऊक, जीवनशैली, खेळ, लक्झरी ब्रँडला आता खरी चलती सुरू झाली आहे. गेले २ दिवस शेअर बाजारातील चढता आलेख यांची चाहूल देण्यास पुरेसा आहे. भारत सरकारने दिलेल्या नव्या आकडेवारीनुसार ग्रामीण, शहरी भागातील झालेल्या घरगुती खर्चात वाढलेल्या मोठ्या प्रमाणात लोकांची जीवनशैली बदलत आहे. केवळ ती रोटी, कपडा, मकान, मोबाईल न राहता आता आरोग्य, शिक्षण, छंद, लाईफस्टाईल या सगळ्या प्रकारात लोक पैसे खर्च करू लागलेत. आकडेवारीतही घरगुती खर्चात ३३ ते ४० टक्के झालेली वाढ ही याचीच नांदी आहे. त्यातही विशेषत अन्नधान्य व डाळी यावरील खर्चात वाढ थांबली किंवा कमी झाली असल्याने खर्च म्हणजे ' अत्यावश्यक वस्तू ' ही संकल्पना भारतीय लोकांनी मोडीत काढली आहे.
सर्वांगीण विकास व प्रगती हे शब्द चांगले असले तरी लोकांच्या मूलभूत गरजा वाढल्या आहेत याबद्दल किती राजकारण्यांना जाणीव असेल याबद्दल आपण सांगू शकत नाही. पण भारतीय ग्राहक आता सक्षम झाला आहे याची खात्री मात्र नक्कीच येते. भारतातील वाढलेल्या लक्झरी गाड्यातील विक्री, वाढलेले आयफोन ग्राहक, इतकेच नव्हे तर स्मार्टफोन्सवरून अगदी घेतलेले वयक्तिक कर्ज ही त्यांची अनेक उदाहरणे आहेत. हेच नेमके ब्रँडने लक्षात घेतले आहे.
ब्रँड इकोसिस्टीमचे काम हे लोकांच्या मानसिकतेतून ठरत असते. लोक कशावर काय विचार करतात यावर जाहीरातीचा आशय व वस्तूचे ब्रँडिंग ठरते. अखेरीस त्याला साथ मिळते महत्वाचा मोसमांची. जाहिरात क्षेत्रातील संधीने ' जाहिरात विरहित' वर्मीने कमी झाल्या असल्या तरीदेखील जाहिरातींच्या गरजा व व्यासपीठ सतत बदलत असतात. याचा बारकावे ओळखत आता जाहिरातीचा ओघ आयपीएल व निवडणूकीत सुरू होईल असे स्पष्ट दिसत आहे.
ग्रुप 'एम ' चा अहवाल यावर भाष्य करतो. ग्रुप एमच्या ' धिस इयर नेक्स्ट इयर 'अहवालातील माहितीनुसार, जाहिरात क्षेत्रातील महसूलात २०२४ मध्ये १५५३८६ कोटी रूपयाने वाढणार आहे. यामध्ये डिजिटल जाहिरातीत तर हा आकडा १३ टक्क्याने वाढू शकतो असे या अहवालात तज्ञ मंडळीनी म्हटले आहे. या अहवालाशिवाय केवळ डिजिटल नाही, तर मोबाईल जाहिरात, होर्डिंग्ज, बीपीएल, एओल, पारंपरिक जाहीराती, इ कॉमर्स, रिटेल सेल्स या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात जाहिरात निर्मिती होऊन शेवटी ग्राहकांना ब्रँड म्हणून विकसित करण्यास कंपन्या हिरीरीने सहभागी होतील.
ग्रुप एम च्या अहवालात आर्थिक वर्ष २३-२४ मध्ये डिजिटल १३ %, टिव्ही ० %, प्रिंट ४ %, आऊटडोअर १२ % रेडिओ ४ %, सिनेमा १५ % ने जाहिरातीतील महसूल वाढला आहे.
पीच मॅडिसन जाहिरात अहवालानुसार जाहिरात क्षेत्रातील आर्थिक वर्ष २४-२५ मध्ये खर्चावर कंपन्यांचे १२ टक्के महसूल खर्च होऊ शकतो. विशेष म्हणजे प्रिंट माध्यमातील जाहिरातीवर देखील कंपन्या लक्ष ठेवून आहेत. उदाहरणार्थ प्रिंट माध्यमात आर्थिक वर्ष २०२१ मधील १६५९५ कोटींचा खर्च २०२२ साली १८४७० कोटी व २०२३ साली १९२५० कोटी रुपये झाले आहेत. या अहवालानुसार भारतातील २०२४ मध्ये गेल्या 4 वर्षातील तुलनेत जाहिरातीत २०२४ मध्ये लक्षणीय वाढ होईल. यातील वर्गीकरणात डिजिटल जाहिराती १७% ने वाढणार आहेत.
आयपीएलचा जाहिरात वाढीत मोठा वाटा -
आर्थिक वर्ष २०२३ मध्ये जाहिरात विश्व ४५० कोटींहून अधिक वाढत १००० कोटीवर पोहोचला आहे. इयर ऑन इयर बेसिसवर या जाहिरातीत याहून अधिक वाढ २०२४ मध्ये होऊ शकते. आयपीएलमध्ये प्रिंटचा वाटा कमी असला तरी डिजिटल, रेडिओ, सिनेमा, आऊटडोअर, मोबाईल सगळ्याच जाहिराती प्रकारात मोठी वाढू शकते. ओओएच (आऊट ऑफ होम) जाहिरातीत गेल्या वर्षीच्या तुलनेत १३ टक्क्याने वाढेल असे अनुमान अहवालात केले आहे. टीव्ही जाहिरातही तुलनात्मक वाढ होऊन ८ टक्क्याने वाढ होऊ शकते.
जाहिरातील अहवालानुसार एफ एस सी जी ,इ कॉमर्स, एज्युकेशन,ऑटो या कंपन्यांच्या जाहिरातीत वाढ होणे अपेक्षित आहे. नुकत्याच विलीनीकरण नक्की झालेल्या डिस्ने रिलायन्स यांच्या करारामुळे जाहिरातील व्यापकता मोठी होऊ शकते. परिणामी वाढलेल्या स्पर्धेत कंपन्यांकडून जाहिरातील गुंतवणूक वाढण्याची शक्यता आहे. ही गुंतवणूक वाढल्यास नक्कीज जाहिरातीचा खर्च वस्तूंच्या किमतीत परावर्तीत होतात.
यामुळे कंपनीच्या नफा मार्जिंनमध्ये वाढ होणार असून आर्थिक घोडदौड देखील वाढेल. परिणामी ग्राहक आयपीएलमधील आवडत्या कलाकार, खेळाडू यांच्या जाहिराती पाहून नक्कीच आयपीएल मोसमात वस्तू खरेदी करतो ही खात्री कंपन्यांनी अनेक वर्षांत कमावली आहे. यातून विशेष 'सेल' नावाखाली इ कॉमर्समध्ये झुंबड पहायला मिळेल.
लोकसभा निवडणूक जाहीरातींचा स्ट्राईक रेट वाढणार -
लोकसभा निवडणूक जवळ असल्याने सगळ्या राजकीय पक्षांच्या जाहीरातबाजीत वाढ होते. परिणामी अनेक मोठे ब्रँड राजकीय पक्षांच्या मागे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आपापले प्रमोशन करतात. लोकसभा निवडणुकपूर्व काळातच राजकीय पक्षांच्या जाहिरातीत मोठी वाढ झाली आहे. निश्चितच जाहिरात विश्वात उलाढाल वाढली आहे. तज्ञांच्या मते येणाऱ्या निवडणूक गेल्या तुलनेत यंदा दुप्पट जाहिरातीतील खर्च वाढणार आहे याशिवाय जाहिरात कंपन्यांतील खर्चात निवडणूक काळात ३० ते ५० टक्के वाढ होणार आहे.
त्यामुळेच जाहिरात विश्वात जाहिरात कंपन्या व बँड या मालामाल होतील असा अंदाज वर्तवला जातोय. अखेर कुठला ब्रँड किती आकर्षक, किती उपयोगी, किती किंमत या गोष्टी निश्चित असल्यातरी ब्रँडची आयपीएल व निवडणूकीतील उपयुक्तता व जाहीरात तंत्र प्रेक्षकांच्या किती पचनी पडणार यावर पुढचा खेळ ठरणार आहे.