आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात अरविंद सावंतांच्या विरोधात पोस्टरबाजी!

    31-Mar-2024
Total Views |

Arvind Sawant & Aditya Thackeray 
 
मुंबई : राज्यात सर्वत्र लोकसभा निवडणूकांची धामधूम सुरु आहे. सर्वच पक्ष निवडणूकीच्या तयारीला लागले आहेत. दरम्यान, वरळी विधानसभा मतदारसंघात वरळीकरांकडून पोस्टबाजी करण्यात आली आहे. दक्षिण मुंबईत बदल घडवणार अशा आशयाचे पोस्टर याठिकाणी लावण्यात आले आहेत.
 
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून उबाठा गटाचे नेते अरविंद सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दुसरीकडे, वरळी विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरे आमदार आहेत. दरम्यान, याठिकाणी वरळीकरांनी पोस्टरबाजी केल्याचे सांगण्यात येत आहे.
 
हे वाचलंत का? -  उद्धव ठाकरेंवर पिक्चर येणार? '१०० कोटी वसुली फाईल्स'ची स्किप्ट तयार!
 
"आमचे नशीब बदलणार दक्षिण मुंबईत यंदा बदल घडविणार" अशा आशयाचे पोस्टर वरळीमध्ये लावण्यात आले आहे. याशिवाय त्याखाली "आम्ही वरळीकर" असेदेखील लिहिण्यात आले आहे. विशेष म्हणजे आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात असे पोस्टर लागल्याने राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आले आहे.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

गोवा म्हटले की नजरेसमोर येतात ती फुलांची आरस केलेली देवालये आणि नितांत सुंदर समुद्रकिनारे! मात्र, गेल्या काही वर्षांत हिंदू संस्कृतीच्या सर्व खुणा अभिमानाने मिरवणार्‍या गोव्यामध्ये, धर्मांतरणाच्या द़ृष्टचक्राने वेग घेतला आहे. इस्लामी आणि ख्रिस्ती धर्मांतरणामुळे भविष्यात गोव्यातील हिंदू लोकसंख्या धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच धर्मांतरणविरोधी कायद्याची गरज नुकतीच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे. गोव्यातील धर्मांतरणाच्या या वाढत्या समस्येचा घेतलेला मागोवा.....

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

‘युनेस्को’ने शिवरायांच्या 12 गडकिल्ल्यांना जागतिक वारशाचा दर्जा नुकताच जाहीर केला. या घोषणेनंतर महाराष्ट्राची मान अभिमानाने पुन्हा एकदा उंचवली. त्याचबरोबर पुन्हा एकदा याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न, काहीजणांकडून जाणीवपूर्वक केला जात आहे. पण, प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या शिरपेचात आलेल्या या यशाचे खरे मानकरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत, यात कोणतीही शंका नाही. मुळात या गडकिल्ल्यांना वारसा दर्जा मिळण्याची संपूर्ण प्रक्रिया लक्षात घेतली, तर हे आपल्या नक्कीच लक्षात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121