“आपण किमान ३ तास तरी...” स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाबद्दल मराठी दिग्दर्शकाची सूचक पोस्ट

    27-Mar-2024
Total Views | 203
रणदीप हुड्डा दिग्दर्शित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाने आत्तापर्यंत बॉक्स ऑफिसवर ११ कोटींचा टप्पा पार केला आहे.
 

savarkar  
 
मुंबई : ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryveer Savarkar) चित्रपटाची यशस्वी घोडदौड सुरुच आहे. देशासाठी लढणाऱ्या, संघर्ष करणाऱ्या सावरकरांचा (swatantryveer Savarkar) भव्य चरित्रपट प्रेक्षकांचे प्रेरणास्थान होत आहे. रणदीप हुड्डा दिग्दर्शित स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट प्रेक्षकांनी आवर्जून पाहावा आणि सावरकरांचा इतिहास पुढच्या पिढिपर्यंत पोहोचावा यासाठी अनेक मराठी कलाकार देखील पुढाकार घेत आहेत. दिग्दर्शक रवी जाधव यांनी या चित्रपटाचे कौतुक करत सोशल मिडियावर रणदीप हुड्डाला सलाम केला आहे.
 
काय म्हणाले रवी जाधव?
 
रवी जाधव यांनी लिहिले आहे की, “प्रत्येकाने आवर्जून पहावा असा चित्रपट!!! रणदीर हुड्डाला सलाम! उत्तम अभिनय, छायाचित्रण, संकलन, VFX, पार्श्वसंगीत. हजारो अडचणींवर मात करुन रणदीपने जिद्दीने ३ वर्ष मेहनत करुन हा प्रेरणादायी चित्रपट पूर्ण केला. आपण केवळ ३ तास वेळ देऊन तो नक्कीच चित्रपटगृहात पाहून प्रेरणा घेऊ शकतो. सावरकरांना वंदन करु शकतो”.
 

savarkar  
 
काय आहे मुग्धा वैशंपायन हिची पोस्ट?
 
मुग्धाने लिहिले आहे की, “हा चित्रपट बघितला. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर या तेजस्वी सूर्याचं आयुष्य अवघ्या जगाला कळावं, त्यांनी आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबाने आपल्या मातृभूमीसाठी केलेला त्याग, त्यांच्यावर झालेला परकोटीचा अन्याय, त्यांचं देशकार्य संपूर्ण जगाला कळावं अशी गेले अनेक वर्ष खूप कळकळीची, तळमळीची इच्छा होती. आज या चित्रपटाच्या रुपाने सावरकर आणि त्यांचं “खरं” कार्य, त्यांच्यावर झालेला अन्याय, हे सगळं संपूर्ण जगभरात अधिकाधिक पोहोचतंय याचा किती आनंद, अभिमान, समाधान वाटतंय काय सांगू! एका सावरकरभक्तासाठी हा खूप आनंदाचा क्षण आहे”.
 
दरम्यान, या पुर्वी अजय पुरकर, सुप्रिया पिळगांवकर, सलील कुलकर्णी यांनी देखील चित्रपट पाहिल्यानंतर त्यांच्या भावना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्या होत्या. २२ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाने आत्तापर्यंत बॉक्स ऑफिसवर १० कोटींचा पल्ला पार केला आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
भारतातून पाकिस्तानात गेलेल्या मोहाजीर समुदायाने केली मोदींकडे ‘ही’ मागणी! म्हणाले, “पाकिस्तानमध्ये आमच्यावर...”

भारतातून पाकिस्तानात गेलेल्या मोहाजीर समुदायाने केली मोदींकडे ‘ही’ मागणी! म्हणाले, “पाकिस्तानमध्ये आमच्यावर...”

पाकिस्तानी मोहजीर समुदायावर होणाऱ्या अन्यायाविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी करण्यात आली आहे. मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंटचे नेते अल्ताफ हुसेन यांनी पंतप्रधान मोदींनी यात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. “पाकिस्तानमध्ये मोहाजिर समुदायावर अन्याय होत आहे. हा विषयावर आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा करावी,” अशी विनंती त्यांनी मोदींना केली आहे. अल्ताफ हुसेन लंडनमध्ये स्थायिक आहेत. त्यांनी व्हिडिओद्वारे ही मागणी केली आहे. ते म्हणाले, “पाकिस्तानमध्ये आमच्यासोबत क्रूरता केली जाते. मोहाजीर समाजाचे आयुष्य धोक्यात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121