उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात 'अग्नितांडव'!

भस्म आरतीदरम्यान लागलेल्या आगीत १४ जण भाजले

    26-Mar-2024
Total Views | 527
उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात (Mahakala Mandir Fire) भस्म आरती दरम्यान लागली आग. मंदिरातील पुजाऱ्यांसह १४ जण भाजले. सहा जणांची प्रकृती चिंताजनक असून इतर सर्वांवर उपचार सुरु.

Mahakal Mandir Fire

भोपाळ :
मध्य प्रदेशचे प्रसिद्ध ज्योतिर्लिंग श्री महाकालेश्वर मंदिराच्या गर्भगृहात भस्म आरती सुरू असताना आग लागली. सोमवारी सकाळी लागलेल्या आगीत मंदिरातील पुजाऱ्यांसह १४ जण भाजले गेले. आरतीवेळी उधळलेल्या गुलालामुळे आग भडकल्याचे सांगण्यात येत आहे. भाजलेल्यांपैकी सहा जणांची प्रकृती चिंताजनक असून इतर सर्वांवर सध्या उपचार सुरु आहेत.

हे वाचलंत का? : १०० टक्के मतदानासाठी नवीन मतदारांना विहिंप जागरूक करणार! : मिलिंद परांडे

धुलिवंदनच्या निमित्ताने हजारो भाविक त्यावेळी मंदिरात उपस्थित होते. एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार तेथील एका जखमी सेवकाने सांगितले की, आरती करत असलेले पुजारी संजीव यांच्यावर उधळलेला गुलाल पेटत्या दिव्याच्या संपर्कात आला. गुलाल केमिकलयुक्त असल्याकारणाने आग लागली असावी. गर्भगृहाच्या चांदीच्या भिंतीला रंग आणि गुलालापासून वाचवण्यासाठी तेथे फ्लेक्स लावण्यात आले होते, तेही आगीच्या संपर्कात आले.

काही लोकांनी अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत गर्भगृहात आरती करत असलेले १४ जण भाजले गेले. सदर प्रकरणी विशिष्ट समिती अंतर्गत चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून तीन दिवसांत अहवाल सादर करणार असल्याचे उज्जैनचे जिल्हाधिकारी नीरज सिंह यांनी सांगितले.


अग्रलेख
जरुर वाचा
गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा टप्पा) अंतर्गत बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळ्या बोगद्याच्या बांधणीला आता गती मिळणार आहे. प्रत्येकी ४.७ किलोमीटर अंतराच्या आणि ४५.७० मीटर रुंदीच्‍या जुळ्या बोगद्यासाठी आवश्‍यक असलेली १९.४३ हेक्‍टर वनजमीन बृहन्‍मुंबई महानगरपालिकेकडे वळती करण्‍यास केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता मिळाली आहे. त्‍यानुसार, अटी व शर्तींचे अनुपालन तसेच पूर्ततेची ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121