अदानी पोर्टसचा पूर्व किनाऱ्यावर विस्तार गोपालपूर पोर्टचे अधिग्रहण केले

अदानी समुहाकडून ३०८० कोटींची गुंतवणूक

    26-Mar-2024
Total Views |

Adani Ports  

मुंबई:अदानी समुहाकडून पूर्वेच्या किनारी आता आपले साम्राज्य पसरवले जाणार आहे. अदानी पोर्ट या अदानी समूहातील कंपनीकडून गोपालपूर पोर्ट लिमिटेड कंपनीचे संपादन (Acquisition ) केले जाणार आहे.यासाठी अदानी समूहाने ३०८० कोटी रूपयांची तरतूद केल्याचे सांगण्यात येत आहे. गोपालपुर हे भौगोलिकदृष्ट्या महत्वाचे पोर्ट आहे जे रेल्वे रोड यांच्या कनेक्टिव्हिटीमध्ये महत्वाचे ठरते. सध्या गोपालपूर पोर्टची क्षमता २० एमएमटीपीए असून याहून ती भविष्यात वाढू शकते.
 
अदानी समुहाकडून एस अँड पी ग्रूपमधील ५६ टक्के व ओरिसा स्टीवडोअर लिमिटेड (Orissa Stevedores) कंपनीतील ३९ टक्के समभाग अदानी पोर्टस व स्पेशल इकॉनॉमिक झोन या कंपनीकडून खरेदी केले जाणार आहेत.सध्या अदानी पोर्टस ही भारतातील सर्वात मोठी पोर्ट व लॉजिस्टिकस कंपनी आहे. पूर्वी किनारा पट्ट्यात आपला विस्तार करण्यासाठी अदानी पोर्टसकडून हा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे.
 
यासंबंधीचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने प्रथम दिले असून कंपनीच्या तरतूदी नियमावली प्रकिया यानंतर हा व्यवहार होण्याची शक्यता आहे.ओडिशा सरकारने जीपीएल (Goaplpur Port Limited) २००६ मध्ये ३० वर्षासाठी ही सवलत देऊन प्रत्येकी १० वर्षासाठी ही तरतूद कालावधी वाढवला होता.
 
यासंबंधी अदानी समुहाचे कार्यकारी संचालक करन अदानी म्हणाले, 'गोपालपूर पोर्टचे अधिग्रहणामुळे आम्ही ग्राहकांसाठी नवीन व चांगला पर्याय देऊ शकू. लॉजिस्टिकसचा दृष्टीने ओरिसा व आसपासच्या राज्याच्या माध्यमातून आम्ही प्रभावीपणे काम करू शकतो. अदानी समुहात गोपालपूर पोर्टचे येणे हे अदानी पोर्टस व सेझच्या लॉजिस्टिकसचा दृष्टीने प्रभावी ठरणार आहे.'अपसेझ
(APSEZ) हे भारतातील सर्वांत मोठे पोर्ट ऑपरेटर व डेव्हलपर आहे. याचा विस्तार भारतातील मुद्रा, टुना, दहेज, हझिरा, दिघी, विंझीजाम येथे आहे.
 
आर्थिक वर्ष २३-२४ मध्ये गोपालपूरने ११.३ एम एम टी (MMT) हाताळले असून इयर ऑन इयर बेसिसवर कंपनीला ५२ टक्के वाढ मिळाली आहे. कंपनीचा इयर ऑन इयर बेसिसवर महसूल ५२० कोटींपर्यंत पोहोचला असून (YoY) ३९ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर EBITDA (करापूर्वीचा नफा) ६५ टक्के इतका वाढला आहे.