उर्वशी रौतेला पोहोचली अयोध्येत, रामललाचे घेतले दर्शन

    23-Mar-2024
Total Views | 37
उर्वशी रौतेला राजकारणात प्रवेश करणार अशा चर्चा देखील रंगल्या असून यावर तिनेच महत्वाचे विधान केले आहे.
 

urvashi 
 
मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्रा मुलगी मालती आणि नवरा निक सोबत नुकतीच अयोध्येत गेली होती. तिच्यापाठोपाठ आता अभिनेत्री उर्वशी रौतेला हिने देखील अयोध्येत (Ayodhya) जाऊन प्रभू श्रीरामाचे (Ayodhya) दर्शन घेतेल आहे. काही दिवसांपुर्वीच तिच्या जेएनयु या चित्रपटाची घोषणा झाली होती.
 
उर्वशीचे अयोध्येतील फोटो सोशल मिडियावर सध्या व्हायरल झाले आहेत. रामललाचे दर्शन घेताना तिने पारंपरिक पोशाख परिधान केलेला दिसत आहे. तसेच, काही दिवसांपासून उर्वशी राजकारणात प्रवेश करणार अशाही चर्चा रंगल्या होत्या. यावर उत्तर देताना उर्वशी म्हणाली, "मला तिकीट मिळालंय. आता फक्त राजकारणात प्रवेश करायचा की नाही हा निर्णय माझा आहे. मी राजकारणात जाईल की नाही माहित नाही, पण याविषयी माझ्या फॅन्सच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यात मला रस आहे. त्यांनीच सांगावं की मी राजकारणात जावं की नाही." त्यामुळे आता तिला कोणत्या पक्षातून तिकीट मिळाले आहे आणि ती कुठून निवडणूकीसाठी उभी राहणार? याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
 
 
 
उर्वशी रौतेला हिचा JNU चित्रपट ५ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. यात तिच्यासोबत रवी किशन आणि मराठमोळा सिद्धार्थ बोडकेही विशेष भूमिकेत झळकणार आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121