मुंबई:ऑफिस स्पेस (Office Space) मागणीत मोठी वाढ झाल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहेत.सहा शहरांमध्ये मुख्यतः ही वाढ झाली असुन जानेवारी मार्च तिमाहीत ही वाढ झाल्याचे कॉलियर्स (Colliers) सर्व्हेत म्हटले गेले आहे.रियल इस्टेट कन्सल्टंट कॉलियर्स इंडियाने तिमाही संपण्याच्या आधी नऊ दिवस आधी आणला आहे.
दिलेल्या माहितीनुसार,एकूण कार्यालयांच्या मागणीत झालेली वाढ १३.६ दशलक्षाने वाढ झाली आहे जी प्रामुख्याने दिल्ली,मुंबई, चेन्नई, हैद्राबाद,पुणे या शहरात ही वाढ झाल्याचे सर्व्हेत म्हटले आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये ही वाढ प्रामुख्याने झाली आहे.
लिजिंग (Leasing) मध्ये १०.१ दशलक्ष स्क्वेअर मीटर जागेला मागील आर्थिक वर्षी मागणी या अहवालात नोंदवण्यात आली आहे. हैद्राबाद,मुंबई,बंगलोर,दिल्ली एनसीआर या शहरात मागणी वाढत चेन्नई मध्ये मात्र मागणी कमी झाल्याचे चित्र आहे.
अहवालानुसार पुण्यातील मागणीत कोणताही बदल झालेला नाही. मुंबईतील मागणीत ९० टक्क्याने वाढ होण्याची शक्यता असून १ दशलक्षाहून ही वाढ १.९ दशलक्ष होण्याची शक्यता आहे. तर बंगलोर मधील मागणी २५ टक्क्याने वाढण्याची शक्यता आहे. बंगलोर मध्ये ३ दशलक्ष स्क्वेअर मीटरवरून ही मागणी ४ दशलक्ष स्क्वेअर मीटर पर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
दिल्ली एनसीआरमधील ही मागणी १४ टक्क्यांवर वाढत असल्याची शक्यता आहे.२.२ दशलक्षाहून ही मागणी वाढत २.५ दशलक्ष स्क्वेअर मीटर पर्यंत वाढण्याची शक्यता आहे.चेन्नईतील मागणीत ६ टक्क्यांनी घट झाली असून ६ दशलक्ष स्क्वेअर मीटरवरून थेट १.५ दशलक्ष स्क्वेअर मीटरपर्यंत या वर्षात कमी झाले आहे.
तिमाहीपूर्वी अहवालाचा निकाल जाहीर केला असल्याने त्यावर प्रसारमाध्यमांनी विचारता कोलियर्स इंडियाने सांगितले, 'एकूण लिजिंग संख्यांसाठी लेखांकन करताना केवळ बंद व्यवहारांचा विचार केला आहे. येत्या आठवड्यात तिमाहीचे फक्त 3 कामकाजाचे दिवस उरले असल्याने बंद होण्याची अपेक्षा असलेल्या मोठ्या आणि मोठ्या सौद्यांचा समावेश करण्यात आला आहे."