'मी केजरीवालांच्या १० पैकी ४ घोटाळ्यांचा साक्षीदार'; सुकेश चंद्रशेखर यांनी पत्रात काय लिहलं?

    23-Mar-2024
Total Views | 133
Conman Sukesh's message to Arvind Kejriwal

नवी दिल्ली
: फसवणुकीच्या आरोपाखाली तुरुंगात असलेला महाठग सुकेश चंद्रशेखर याने अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहिले आहे. ५ पानी पत्रात सुकेशने मुख्यमंत्री केजरीवाल यांचे तिहार तुरुंगात स्वागत केले आहे. महाठग यांनी आम आदमी पक्षावर उपहासात्मक टीका केली आणि पक्ष भ्रष्टाचारात गुंतल्याचे सांगितले. अखेर कायद्याचा विजय झाल्याचा दावा करत सुकेश यांनी केजरीवाल यांच्या अटकेचे वर्णन नव्या भारताच्या ताकदीचे उदाहरण म्हणून केले आहे. हे पत्र दि.२२ मार्च २०२४ रोजी लिहिले आहे.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सुकेशने तिहार तुरुंगातून पाठवलेल्या पत्रात अरविंद केजरीवाल यांना संबोधित केले. त्यांनी लिहिले, “अरविंद केजरीवाल, सर्वप्रथम मी तुमचे स्वागत करतो. तिहार क्लबचे बॉस. तुमचे कट्टर प्रामाणिपणाचे नाटक संपलयं. मी खूप भाग्यवान आहे की माझ्या वाढदिवसाच्या ३ दिवस आधी तुम्हाला अटक करण्यात आली आहे. तुमच्या पक्षातील सर्व भ्रष्टाचार समोर आला आहे. आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीत तुमच्या पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागणार आहे. नेहमीप्रमाणे सत्याचा विजय होतो.”

या पत्रात सुकेश यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावरही टीका केली आहे. त्याने लिहिले, “तुझी अटक माझ्यासाठी वाढदिवसाची सर्वोत्तम भेट आहे. सत्य जास्त काळ लपून राहू शकत नाही हे तुम्हाला माहीत नव्हते. मला आनंद आहे की माझे तीन भाऊ आता तिहार क्लब चालवायला आले आहेत.” सुकेशने या ३ लोकांना A, B आणि C श्रेणीमध्ये विभागले आहे. यामध्ये A म्हणजे अरविंद केजरीवाल, B म्हणजे मनीष सिसोदिया आणि C म्हणजे सुरेंद्र जैन. केजरीवाल यांचा भ्रष्टाचार आता उघड्यावर येणार असल्याचा दावाही सुकेशने केला आहे.

सुकेश चंद्रशेखर यांनी पत्रात म्हटले आहे की, अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात किमान १० घोटाळे केले आहेत. यापैकी सुकेशने स्वत:ला ४ घोटाळ्यांचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार घोषित केले असून त्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावाही केला आहे. सुकेशने पुढे लिहिले की, “दिल्लीच्या गरीबांना लुटले गेले आहे. त्यामुळे मी तुमचा भ्रष्टाचार लोकांसमोर आणेन. मी तुझ्याविरुद्ध सरकारी साक्षीदार बनवीन. दिल्ली अबकारी प्रकरण ही फक्त सुरुवात आहे. सध्याचा काळ रामराज्य असल्याचे सांगताना सुकेश यांनी पुढे लिहिले की, भगवान रामाने अरविंद केजरीवाल यांना शिक्षा केली आहे.सुकेशने पत्रात आम आदमी पार्टीला जगातील सर्वात भ्रष्ट पक्ष म्हटले आहे.


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121