मुंबई: खाजगी इक्विटी (Private Equity) व व्हेंचर भांडवल (Venture Capital) मध्ये घट झाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. फेब्रुवारी महिन्यात खाजगी इक्विटी व व्हेंचर भांडवलात ३९ टक्क्याने घट होत २.२ अब्ज रूपयांपर्यंत पोहोचले असल्याचे गुरुवारी एका अहवालात म्हटले गेले आहे.
आयव्हीसीए (IVCA) व कन्सल्टंसी समुहाने दिलेल्या माहितीत जानेवारी महिन्यातील या प्रकारातील व्यवहारांची संख्या जानेवारी महिन्यात ८५ वरून वाढत फेब्रुवारी महिन्यात १२० झाली होती.
फेब्रुवारी २०२१ नंतर सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकावर निम्न गुंतवणूक झाली या फेब्रुवारीत झाली आहे. परंतु आम्ही सावध असून भविष्यातील सकारात्मकपणे गुंतवणूकीचा विचार करत आहोत. भारत व जगभरात निवडणूक सायकल आले असून २०२४ मध्ये मोठ्या अर्थव्यवस्था निवडणूकीला सामोरे जातील अशी प्रतिक्रिया कन्सल्टंसीचे भागीदार विवेक सोनी म्हणाले आहेत.
फेब्रुवारी महिन्यातील सर्वाधिक व्यवहार (ट्रेडिंग) पाहता त्यांचे मूल्यांकन १०० दशलक्ष डॉलर्स किंवा त्याहून अधिक होते.
जानेवारी २०२४ मधील ५ अब्ज डॉलरहून मात्र ते ८२ टक्क्यांहून कमी असल्याचे यात म्हटले गेले आहे. त्याहून आधीच्या वर्षी या व्यवहारांची संख्या ३ अब्ज डॉलरहून अधिक होती बायजूज कंपनीचा २०० दशलक्षचा राईट इश्यू (Right Issue) व एनआयआयएफ (NIFF) ची आयबस नेटवर्क (Ibus Network) मधील तितक्याच मूल्यांचे व्यवहार पाहता तितकी उलाढाल फेब्रुवारी महिन्यात झाली असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
फेब्रुवारी महिन्यातील २.२ अब्ज डॉलरच्या उलाढालीत ७५० दशलक्ष डॉलर्स हे केवळ बाय आऊट (Buyout) मधून असल्याचे यात म्हटले गेले. याशिवाय स्टार्टअप (Startup) मधील गुंतवणूकीचा दोन क्रमांकाचा सर्वाधिक हिस्सा असून यातून ५५४ युएस डॉलरचे उत्पन्न एकूण ६५ व्यवहारातून मिळाले आहे.
क्षेत्रीय विभागात इन्फ्रास्ट्रक्चर मधून सर्वाधिक गुंतवणूक (४१२ दशलक्ष कोटी डॉलर) गुंतवणूक फेब्रुवारीत मिळाली आहे. त्यानंतर गुंतवणूकीत तंत्रज्ञान व फायनांशियल सर्विसेस यांचा अनुक्रमे ३५९ व २५३ दशलक्ष डॉलर्सचा वाटा आहे.
एकूण निधी संकलनात जानेवारी २०२४ मधील १.१ अब्जाच्या तुलनेत फेब्रुवारी २४ मध्ये १.३ अब्जची गुंतवणूक मिळाली आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये ही गुंतवणूक ८६९ दशलक्ष डॉलर्स इतकी होती.