मुंबई: इंडियन स्टील असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून नवीन जिंदाल यांची निवड झाल्याचे असोसिएशनने प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहेत.जाहीर केल्यानुसार, नवीन जिंदाल हे संस्थेचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी असणार असल्याचे स्पष्ट केले गेले आहे.
इंडियन स्टील असोसिएशनच्या समितीने हा निर्णय घेतलेला आहे. इंडियन स्टील असोसिएशनचे (ISA) हे नियामक मंडळ स्टील क्षेत्रातील महत्वपूर्ण निर्णय घेत असते.संस्थेने आता स्टील उत्पादनातील (Manufacturing) मधील मोठे लक्ष ठेवलेले आहे.
पर्यावरणपूरक निर्मितीसाठी कार्बन फूटप्रिंट काम करण्यासाठी संस्था कटिबद्ध असल्याचे संस्थेने आपल्या निवेदनात म्हटले आहे.नवीन जिंदाल यांच्यापूर्वी दिलीप ओमेन हे इंडियन स्टील असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते.
याप्रसंगी बोलताना, नवीन जिंदाल म्हणाले,"भारताची विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी, पोलाद आणि त्याच्या अपस्ट्रीम आणि डाउनस्ट्रीम मॅन्युफॅक्चरिंग व्हॅल्यू चेनला एकत्रितपणे वाढवावी लागेल." अशी भावना व्यक्त केली आहे.